मंगळवेढा, – तालुक्यातील ग्रामीण भागातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन राजस्थानात पळवून नेल्याप्रकरणी आरोपी गणेश पुतळप्पा नरळे याला जोधपूरमधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, आरोपीस पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीने एका अल्पवयीन मुलीस ग्रामीण भागातून फूस लावून पळवून नेले होते. पोलीस निरीक्षक
रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक तयार करुन अपहरणकर्त्या मुलीचा व आरोपीचा शोध जिल्ह्याच्या कानाकोप-यात घेण्यात आला. मात्र ते मिळून आले नाहीत. या घटनेत पळवून नेण्यास मदत करणा-या आरोपीची पोलिसांनी माहिती काढून त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी हा राजस्थानमधील जोधपूर येथे
गेल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख, पोलीस अंमलदार शबनम शेख, सुवर्णा मोरे, सूरज देशमुख यांचे पथक राजस्थान येथे पाठवून आरोपीस ताब्यात घेवून मंगळवेढ्यात आणण्यात आले. आरोपी गणेश नरळे यास पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे