16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसोलापूरअवकाळीचे पंचनामे न करता शेतक-यांना सरसकट मदत करावी

अवकाळीचे पंचनामे न करता शेतक-यांना सरसकट मदत करावी

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
मागील दोन दिवसांपूर्वी सततच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतक-यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे व द्राक्ष डांिळब फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पिके व फळबाग जमीनदोस्त झाली आहेत.पंरतु जिल्ह्यातील महसूल विभागाने अद्याप पंचनामे केले नाहीत. कृषी खातें फक्त कार्यालयात बसून माहिती मागवत आहे. त्यामुळे शेतक-यांनची दयनीय अवस्था झाली आहे. कोरोनातून शेतकरी सावरण्या आगोदर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अवकाळी व पुर परिस्थिती मुळे शेतक-यांनचे प्रचंड नुकसान झाले होते.

त्या नुकसानीचे सर्व जिल्ह्याचे पंचनामे झाले त्या अवकाळी मदत निधीमधून करमाळा पंढरपूर मंगळवेढा सांगोला माळशिरस व दक्षिण सोलापूर चा मुंद्रुप भाग वगळा एक दमडी ही या पाच तालुक्यातील शेतक-यांना अद्याप दिली नाही. तर सांगोला व पंढरपूर पिक विम्यातून पूर्ण पणे वगळे अशातच दोन दिवसांपूर्वी सततच्या अवकाळीने शेतक-यांच्या रब्बी हंगामाच्या ज्वारी गहू मका हरभरा तुर कांदा या पिकांचे कडधान्यांचे पालेभाज्यांचे आतोनात नुकसान होऊन शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. कांदा शेतात सडला आहे ज्वारी आडवी झाली आहे तर द्राक्षे डांिळब सह केळी आंबा बोर फळबागांची प्रचंड हानी झाली आहे. जिल्ह्यातील द्राक्षे बागायतदार उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. द्राक्षे बागांची नव्यानेच काडी फुटण्याची अवस्था असताना अवकाळी पाऊसाने अचानक सुरूवात केल्याने घड बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू असतानाच फुलोरा गळणे घड कुजणे घड करपने व दावण्या सारख्या रोगांने थैमान घातले आहे. डांिळबाच्या बागा फुल गळ होऊन तेल्याचे प्रमाण वाढले आहे. तरी महसूल खात्याने व कृषी खात्याने सर्व नुकसानीचा अंदाज घेतला आहे परंतु पंचनामे न केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरसकट रब्बी च्या पिकांना मदत करावी व द्राक्षे डांिळब फळबागांना विषेश पॅकेज तात्काळ जाहीर करावे अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांनी केले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले आहे.युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, गणेश भोसले, मल्लिकार्जुन दारफळे, नागेश रामपुरे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन करजोळे, विशाल जाधव, शिलवंत छपेकर, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अजित करचे, सिध्देश्वर गाडे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या