26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeसोलापूरइंदापूरच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलणार

इंदापूरच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलणार

एकमत ऑनलाईन

तालुका प्रतिनिधी / इंदापूर
इंदापूर तालुक्याबरोबर इंदापूर शहरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबध्द आहे. इंदापूर शहराची वेगळी ओळख निर्माण करावयाची आहे. विकास कामांच्या बाबतीत इंदापूरकरांनी.ंिचता करू नये. एका वर्षात इंदापूरचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलणार आहे अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर शहरातील ज्योतिबा मंदिर परिसर या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शनिवार (दि. २२ ) रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी उपनगराध्यक्ष अरंिवद वाघ, विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे, नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, स्वप्निल राऊत, माजी नगरसेवक दादा सोनवणे, प्रा. अशोक मखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर शहरातील विविध विकास कामांकरिता पाच कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे. त्यातून इंदापूर शहारात नागरिकांच्या सोयीसाठी विविध कामे जलद मार्गी लागणार आहेत. तसेच सध्या त्या कामांचे तांत्रिक मान्यता व टेंडर प्रक्रिया चालू आहे. ती कामे लवकरच चालू होतील. येणा-या काळात इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली दिसतील.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या