24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरउजनी धरणातून कोणत्याही क्षणी भीमा नदीत पाणी सोडण्याची शक्यता

उजनी धरणातून कोणत्याही क्षणी भीमा नदीत पाणी सोडण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी / टेंभुर्णी :
माढा तालुक्यातील भीमनगर येथील उजनी धरण १ डिसेंबर च्या सायंकाळ पासून धरण परिसरामध्ये व धरणाच्या वरील भागात असलेल्या व्यापक क्षेत्रा मध्ये संततधार व मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच बुधवारी एक डिसेंबर रोजी पुणे जिल्हा, मावळ भाग,व लोणावळ्याच्या पश्चिम भाग परिसरामध्ये देखील अवकाळी पावसाने सतत सात ते आठ तास थैमान घातले आहे.

या सर्व परिस्थितीमुळे पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पावना, इंद्रायणी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे तसेच उजनी परिसरात होत असलेल्या संततधार पावसामुळे व पुणे जिल्ह्यातून येणा-या पाण्यामुळे उजनी धरणातील पाण्याच्या पातळीत अचानक केव्हाही वाढ होऊ शकते हे निश्चित. धरणातील पाण्याच्या पातळीचे योग्य नियोजन राखण्यासाठी धरणाचे काही दरवाजे उघडून भीमा नदी पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीमुळे भीमा नदी काठच्या लोकांनी वेळीच सतर्क राहावे असे आव्हान उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे जनतेला कळवलेले आहे.

मागील २४ तासात उजनी धरण परिसरामध्ये १०० ते११० मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तसेच उजनी धरणामध्ये१५ ऑक्टोबर २१ रोजी१११ टक्के पाणीसाठा होता तो आता १०४ टक्के झालेला आहे, म्हणजेच दीड महिन्यात सात टक्के पाणीसाठा कमी झालेला असून चार टीएमसी पाणी कमी झालेले आहे. जलाशयातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात नेहमीच होत आहे. सध्या अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे व केव्हाही भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात होईल, म्हणून नदीकाठच्या सर्व नागरिकांना धरण व्यवस्थापन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या