19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसोलापूरएक हजार रुपयांच्या ऊसदर फरकाबाबत जाब विचारा

एक हजार रुपयांच्या ऊसदर फरकाबाबत जाब विचारा

एकमत ऑनलाईन

तालुकाप्रतिनिधी/कुर्डुवाडी
सोलापूरच्या आणि कोल्हापूरच्या माणसात-मातीत बदल नाही तर ऊस दरात १ हजार रुपयांचा फरक कसा ? असा प्रश्न उपस्थित करून माजी खा. राजू शेट्टी यांनी कारखानदारांच्या चो-या रोखण्यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांनी आतातरी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले. विमा कंपन्यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तांदुळवाडी (ता. माढा) या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात रविवारी सायंकाळी शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी यांनी हजारो शेतक-यांसमोर साखर कारखानदारांची पोलखोल केली. एफआरपी, रिकव्हरी, मोलॅसेस, मालक ऊसतोडची बोगस नावे या कारखानदारांच्या चो-याबरोवरच पिकविमा, विज बिलाबाबत त्यांनी शेतक-यांच्या डोळ्यात अंजन घातले.

याप्रसंगी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, तानाजी बागल, कार्याध्यक्ष अजिनाथ परबत, संघटक सिद्धेश्वर घुगे, देविदास वाघमोडे, तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, प्रताप मिसाळ, नागनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात अतुल गवळी यांनी आंदोलकांचे गाव म्हणून तांदुळवाडीची ओळख सांगितली.
राजू शेट्टी यांनी साखर उत्पादन प्रक्रिया दोन्ही कडची समान असताना सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार १ हजार रुपये कमी देतात म्हणजेच एकरी ६० हजार रुपयांचे नुकसान शेतक-यांना सोसावे लागते. कमी दराबाबत एकजुटीने कारखानदारांना जाब विचारणे गरजेचे असल्याचे सांगितले. काटा मारत नाही, अशा थापा मारणार्या कारखानदारांनी मालक तोडची बोगस यादी जाहीर करावी, असे शेट्टी यांनी आव्हान दिले.

रविकांत तुपकर यांनीही झंझावाती भाषण करताना शेतकर्यांना हक्काची जाणिव करून दिली. पिकविमा कंपन्या शेतकर्यांची मोठ्याप्रमाणात लूट करीत असताना सरकार धुतराष्टाची भूमिका बजावत आहे. या कंपन्याविरोधात संघटना औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विलास दोलतडे यांनी तर शांतीलाल गवळी यांनी आभार मानले.

यावेळी युवा आघाडी राज्य अध्यक्ष अमरंिसह कदम, प्रवक्ते रणजित बागल, रवींद्र इंगळे, विजय रणदिवे, सरपंच रणजित पाटील,उपसरपंच किरण गवळी, रायाप्पा हळणकर,सचिन पाटील, दिलीप गवळी, एकनाथ सुर्वे, शहाजान शेख, बाहुबली साळवे,तानाजी बागल, रवी गोडगे,दिनेश गाडेकर,दीपक शिंदे,बापू खडतरे,अमोल घुमरे, हनुमंत भोसले,सुरेश बोरकर विविध जिल्ह्यांतील व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या