24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरकारागृहातील दोन कैद्यांत तुफान हाणामारी

कारागृहातील दोन कैद्यांत तुफान हाणामारी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पहिल्यांदा शौचास जाण्याच्या . कारणावरून दोन आरोपींनी एकमेकांशी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत एका आरोपीने दुस-या आरोपीस भिंतीवर ढकलून दिल्याने त्याच्या कानाजवळ मार लागून तो जखमी झाला. त्याच्यावर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्याला पुन्हा लॉकअपमध्ये ठेवण्यात आले.

२५ जून रोजी सकाळी ८.४५ च्या सुमारास सांगोला येथील दुय्यम कारागृहातील बराक क्र. २ मध्ये ही घटना घडली. याबाबत लॉकअपगार्ड अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल हणमंत माळी यांनी प्रशांत विलास पाटील या आरोपीविरुद्ध फिर्याद दीली आहे.

सांगोला दुय्यम कारागहात विविध गुन्ह्यांतील आरोपींना चार लॉकअपमध्ये ठेवले जात आहे. आरोपी ठेवण्याची क्षमता कमी असताना लॉकअपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक आरोपी बंदी करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व आरोपींना दाटीवाटीने दिवस काढावे लागत आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या