प्रतिनिधी/सोलापूर
महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर रहावे म्हणून ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नविन कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केलेले आहे. यानुसार कृषीपंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात येत असून, थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, वने राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री श्री. भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर, शहर पोलीस आयुक्त हरीश बैजल, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ंिहमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, कृषी सभापती अनिल मोटे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंर्त्य सैनिक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
खरीप हंगाम 2021 मध्ये दोन लाख 22 हजार शेतक-यांनी एक लाख 73 हजार हेक्टर पिकाचे विमा संरक्षण करून घेतले होते. स्थानिक आपत्तीत विमा कंपनीने निकष पूर्ण करणा-या 98 हजार 164 शेतक-यांना 68 कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून वितरित केलेले आहेत. डांिळब, द्राक्षे आणि केळीची आंतरराष्ट्रीय निर्यात वाढल्याने बळीराजाला फायदेशीर होत आहे, अशी माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन निमित्त ज्येष्ठ स्वातंर्त्यसैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, कोविड योद्धे व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले त्यानंतर त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले.