24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरखल्लास करण्याची धमकी देत मारहाण, चौघांवर गुन्हा

खल्लास करण्याची धमकी देत मारहाण, चौघांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

मोहोळ : शेंड्या सानपला काय झालं आहे, हे तुला माहीत आहे. तू आम्हाला सांग नाहीतर आम्हीच तुला खल्लास करून टाकू, अशी धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. २८ ऑगस्ट रोजी घडली असून दि. ६ सप्टेंबर रोजी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २८ ऑगस्ट रोजी पाणी फाटा येथे माधव ऊर्फ शेंड्या दिगंबर सानप (सैलहोमा, ता गंगाखेड जि. परभणी) याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यापूर्वी दि.२६ ऑगस्ट रोजी माधव सानप व युवराज सरवळे हे दोघे मिळून होते. तद्नंतर

सानपचा मृत्यूच झाला होता. त्यावेळी मयताचे नातेवाईक तिथे आले होते. त्यांनी दि.२८ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्रदीप मुंढे व इतर तिघांनी शेंड्याला काय झाले होते..? असे सरवळे याला विचारले असता मला काही माहीत नाही असे त्याने सांगितले.

शेंड्याचे गावाकडील लोकांनी तुला सर्व माहीत आहे नेमके काय झाले आहे ते सांग, असे म्हणून प्रदीप मुंढे व इतर ३ अनोळखी लोकांनी त्याठिकाणी मारहाण केली व त्यांनी घेऊन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून एचपी गैस कंपनीच्या पाठीमागील बाजूस घेऊन गेले व प्रदीप मुंढे याने चाकू गळ्याला लावून तू काय आता आम्हाला खरे सांगणार नाही.

त्यामुळे शेंड्यासोबत तुला पण वर पाठवितो असे म्हणून ठार मारण्यासाठी धमकी दिली. लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली व गाडीत घालून सिव्हिल हॉस्पिटलला नेले. नजर चुकवून सरवळे हे पळून जाऊन भाऊजीकडे राहिले. त्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाला असे युवराज सरवळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या