34.3 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeसोलापूरगुंठेवारीच्या प्रश्नातून निघाला मार्ग

गुंठेवारीच्या प्रश्नातून निघाला मार्ग

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
गुंठेवारी प्लॉट धारकांचे बांधकाम नियमित करणे अथवा बांधकाम परवाने देण्याची प्रक्रिया १२ मार्च २०२१ रोजीच्या शासन आदेशान्वये करावी. ३१ डिसेंबर २०२० पूर्वी गुंठेवारी क्षेत्रात झालेली बांधकामे नियमित करता येतील. गुंठेवारी प्रकरणात मोजणी करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख यांच्या १६ डिसेंबर २००३ रोजीच्या परिपत्रकान्वये विकास प्राधिकरणांनी अर्थात महापालिकेने अंमजबाजवणी करावी, असा आदेश नगरविकास मंत्रालयाने गुरुवारी काढला.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुंठेवारी बांधकाम परवाना प्रकरणी शासनाकडे मागितलेल्या मार्गदर्शनास उत्तरादाखल पत्रात हे नमूद केले आहे.

महापालिका प्रशासनाने गुंठेवारी क्षेत्रातील प्लॉट धारकांना नव्याने बांधकाम परवाने प्लॉट मोजणी करुन आणल्या शिवाय दिले जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. यावरुन नगरसेवक बाबा मिस्त्रीसह पालिका पदाधिकारी व नगरसेवकांनी गुंठेवारी प्रकरणे पूर्वी ज्याप्रमाणे नियमित केली जात, त्याच पध्दतीने करावीत यासाठी आग्रह धरला होता. शासनाने गुंठेवारी प्लॉट मोजणी संदर्भात डिसेंबर २००३ मधील परिपत्रकाचा अंमल करावा, असे स्पष्ट आदेश दिल्याने शहरातील डिसेंबर २००० पूर्वी व्यवहार केलेले गुंठेवारी प्लॉट व्ां बांधकामे नियमित करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गुंठेवारी विकासाच्या नियमितीकरणासाठी प्लॉटची मोजणी करणे आवश्यक असल्याचे राज्य शासनाने सांगितले आहे. परंतु गुंठेवारी प्लॉट धारकांनी विद्यमान रेखांकनाच्या आराखड्यासह महापालिकेत अर्ज केल्यांनतर महापालिका भूमि अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करून घेणार आहे.

२० जानेवारी रोजी काढलेल्या परिपत्रकामध्ये शासनाने हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोजणी करण्याविषयी जे तर्कवितर्क लावले जात होते त्याला पुर्णविराम मिळाला आहे. गुंठेवारी प्लॉट नियमित करुन देण्यासाठी जागा मोजणीसाठी पाचशे रुपये मोजणी शुल्क चलन भूमि अभिलेख कार्यालयाकडून मंजूर करून स्टेट बँकेत जमा करण्याची जबाबदारी प्लॉटधारकाची असेल. महापालिकेने भूमि अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहे. मोजणी केल्यास सर्व मिळकतींना नियमानुसार नगरभूमापन क्रमांक नियमाप्रमाणे देणे सोईचे होईल, असे सांगण्यात आले आहे.

सोलापूर महापालिका आयुक्तांनी गुंठेवारी प्रकरणात मोजणी करण्याचे सांगितले आणि राज्यशासनाकडे मार्गदर्शक सल्ला मागितला होता. शासनाने नवीन परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये २००३ च्या नियमानुसार गुंठेवारीची मोजणी करणे आवश्यक असल्याचे सांगितल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत आहे. ते परिपत्रक सविस्तर वाचून त्याचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे नगररचना विभागाचे लक्ष्मण चलवादी यांनी सांगितले.
मिळकतदारांनी विद्यमान रेखांकनासह महापालिकेत अर्ज करावेत. महापालिका भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेईल. याचा अर्थ असा आहे की हे प्रकरण नियमित करून मग मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवणे अपेक्षित आहे, असे नगरसेवक बाबा मिस्त्री म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या