30.8 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeसोलापूरगुजरात रबर फॅक्टरीला भीषण आग

गुजरात रबर फॅक्टरीला भीषण आग

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापुरातील एमआयडीसी भागात असलेल्या गुजरात रबर फॅक्टरी ला मंगळवारी मध्यरात्री च्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झालं. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला बरीच कसरत करावी लागली.

 

एमआयडीसी मधील गुजरात रबर फॅक्टरी ला मंगळवारी पहाटेचे सुमारास आग लागली .या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलासह एन टी पी सी व मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर या तालुक्यातील बंबने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.गुजरात रबर फॅक्टरीतील आग वाढतच जाऊन शेजारच्या गारमेंट आणि अन्य कारखान्याला सुध्दा लागली. आगीची तीव्रता वाढतच गेले अग्निशामक दलाच्या जवानांनी व अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांच्या पथकाने फोम च्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला पण आगीवर नियंत्रण मिळविण्यात बरीच कसरत करावी लागली

आगीची तीव्रता ओळखून अधीक्षक केदार आवटे यांनी जिल्हाधिका-यांशी संपर्क साधून आपत्ती व्यवस्थापनाला सतर्क करण्याचे सूचना दिल्या त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशाने जिल्ह्यातील अग्निशामक दलाचे बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले .

जवळपास 50 गाड्या च्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं. आगीची तीव्रता वाढण्यामागे फॅक्टरीच्या मोकळ्या जागेतही कंपनीने वेस्टेज सामान ठेवल्याने आग भडकत गेल्याचे सांगण्यात येते . कंपनीने कोणतेच यंत्रणा, खबरदारी घेतल्याचे दिसत नाही.तसेच सुरक्षित ठिकाणीही सामान ठेवण्यात आल्याने आग शेजारी असलेल्या दर्शन गारमेंट आणि अन्य कारखान्याला आग लागली या कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले दरम्यान एमआयडीसी या औद्योगिक वसाहतीमध्ये आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी कोणतीच सक्षम यंत्रणा कार्यरत नाहीये

याबाबत वारंवार आवाज उठवण्यात आला तरी कोणीच याबाबत जातीने लक्ष देत नाही गेल्या तीन-चार महिन्यापूर्वी एमआयडीसी भागात सारडा यांच्या रॅपियर रूम व गोडाऊन कारखान्याला भीषण आग लागली होती .आगीमुळे जवळपास पाच ते सहा कोटी रुपयांचा नुकसान झालं होतं.यावेळीही अग्निशामक यंत्रणा तोकडी पडली होती.त्यावेळीही अग्निशामक यंत्रणा सक्षम करण्यात येईल असे सांगण्यात आले होते पण जेव्हा आग लागते तेव्हाच बंब येथे अशा मनाप्रमाणे आग लागल्यानंतरच याबाबत सर्वांकडून दोन चार दिवस चर्चा होते नंतर पहिलं पाढे पंचावन्न प्रमाणे शांत..

दरम्यान गुजरात रबर फॅक्टरी मध्ये ज्वलंनशील पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो या ठिकाणी यापूर्वी छोट्या मोठ्या घटना घडल्या आहेत पण रबर फॅक्टरी कडून मनावर तसा खबरदारी घेण्यात आला नाही हे यावरून स्पष्ट होते. याच रबर फॅक्टरी मधून गेल्या अनेक वर्षापासून अक्कलकोट रोड महामार्गावरील जाणा-या ड्रेनेज चेंबर मध्ये केमिकल मिश्रित पाणी सोडण्यात येत होते यासंदर्भात पाहणी करत असताना अधिकारी वर्ग ज्यावेळेला गुजरात रबर ट्रॅक्टरला पोहोचले तेव्हा त्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता जेणेकरून त्या रबर फॅक्टरीमध्ये वेगळं काही तरी शिजतेय हे या घटनेवरून स्पष्ट होते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या