26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूरघोटाळे लपवण्यासाठीच शिवसेनेसोबत सत्तेत सहभाग

घोटाळे लपवण्यासाठीच शिवसेनेसोबत सत्तेत सहभाग

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. केवळ आपले कुटुंब वाचवावे, आपले घोटाळे लपवावे यासाठीच यांनी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली आणि धर्मनिरपेक्षतेला जमिनीत गाडले अशा शब्दात ओवेसी यांनी टीका केली आहे. शिवसेनेला तुम्ही धर्मनिरपेक्ष म्हणता आणि आम्हाला मात्र जातीयवादी म्हणता, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. आचा मुस्लिम आरक्षणासाठी आपली लढाई सुरू झाली असून मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी येत्या ११ डिसेंबर या दिवशी मुंबईत धडक मोर्चाची घोषणाही ओवेसी यांनी केली आहे.

ओवेसी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडताना ओवेसी म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे फक्त ४८ तासांसाठी नवरदेव झाले होते. केवळ त्यांचे कुटुंब वाचवण्यासाठी ते शिवसेनेसोबत आहेत. आधी फडणवीस आणि अजित पवार यांनी लग्न केले. आता यामध्ये वधू कोण हे शरद पवारच सांगतील, असेही ओवेसी म्हणाले.

शिवसेना हा पक्ष देखील भाजपसारखाच जातीयवादी पक्ष आहे. आम्ही भाजपची बी टीम आहोत असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला म्हणत असतात. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी हेच पक्ष एकत्र आले आणि मुस्लिमांना धोका असल्याचे त्यांनी सांगितले. आता शिवसेना किती धर्मनिरपेक्ष आहे हे शरद पवार आणि राहुल गांधी यांनी सांगावे, असे ओवेसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना म्हटले आहे.

सन १९९२ मध्ये काय झाले हे तुम्ही विसरलात का?, ंअसा प्रश्न ओवेसांनी विचारला. बाबरी मशीद आम्ही पाडली असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात बोलतात आणि धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याची लाज वाटत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आता मुस्लिमांनी या पक्षांवर विश्वास ठेवू नये, त्यांनी आपल्या मतांचा योग्य वापर करावा, असे आवाहनही ओवेसी यांनी केले आहे.

खुल्या मैदानावरील जाहीर सभेला परवानगी नाकारल्यानंतर मंगळवारी सोलापुरातल्या हुतात्मा स्मृती मंदिरात एआयएमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना सत्ताधारी सरकारमधील पक्षांमधील नेत्यांना वेगळा न्याय आणि इतरांसाठी न्याय हा दुजाभाव चालणार नाही. त्यामुळे येत्या ११ डिसेंबरला एमआयएमने चलो मुंबईचा नारा दिला आहे. विशेष म्हणजे सरकारने या मेळाव्याला परवानगी दिली तरी अन नाही दिली तर हा मेळावा होणार असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यांनी या मेळाव्याचे ठिकाण सांगितले नसले, तरी सरकारला निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणे आणि मुस्लिमांचा खालावलेला शैक्षणिक दर्जा यावर प्रश्न विचारणार असल्याचे यांनी म्हंटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या