26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूर‘चिमणी’साठी कारखान्याची जिल्हाधिका-यांकडे धाव

‘चिमणी’साठी कारखान्याची जिल्हाधिका-यांकडे धाव

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
सिद्धेश्वर साखर कारखान्याने चिमणी पाडकामाला स्थगिती मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे धाव घेतली आहे. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरु असून चिमणी पाडल्यास गळीत हंगामाला बाधा निर्माण होईल. त्यामुळे चिमणी पाडकामाला स्थगिती देण्याची मागणी कारखान्याच्या प्रशासनाने केली आहे. चिमणी पाडकामाचा विषय महापालिकेकडे असून तुम्ही महापालिका आयुक्तांची भेट घ्या, असा सल्ला जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कारखान्याला दिला असल्याचे समजते. महापालिका प्रशासनाने श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची को-जनरेशनची चिमणी पाडण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी सात दिवसांची मुदत दिली होती.

या दरम्यान कारखान्याचे न्यायालयीन द्वार बंद करण्यासाठी महापालिकेकडून न्यायालयात कॅवेट दाखल करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. महापालिकेने दिलेली मुदत बुधवारी पूर्ण होत आहे. गुरुवारी चिमणीचे काय होणार? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

शासनाने श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार चिमणी पाडकामासाठी महापालिका प्रशासनाने आता कंबर कसली आहे. मुदतीनंतर चिमणी पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, प्रदूषण नियामक महामंडळ, संबंधित मक्तेदार यांना लेखी पत्र देण्याबरोबरच महापालिकेनी उच्च न्यायालयात श्री सिद्धेश्वर कारखान्याविरोधात कॅवेटही दाखल केले आहे. चिमणी पाडकामाची मुख्य कारवाई महापालिका प्रशासनाकडून होणार आहे. त्याकरिता चिमणी पाडकामासाठी प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीच मक्तेदाराची नियुक्ती केली आहे.

मागील अनुभव लक्षात घेत चिमणी पाडकामादरम्यान आवश्यक असलेल्या यंत्रणेबाबत महापालिका, पोलिस प्रशासन यांची दोन दिवसापूर्वी संयुक्त बैठक झाली आहे. चिमणी निष्कसित करण्याची मुख्य जबाबदारी ही महापालिकेची आहे. या चिमणीचा तांत्रिक अहवाल तयार करून प्रदूषण महामंडळाला देखील महापालिकेने पाचारण केले आहे. चिमणी पाडकाम करताना यातून विषारी वायू बाहेर पडणार आहे. हे प्रदूषण थांबविण्याची जबाबदारी प्रदूषण मंडळाची असणार आहे. त्याबरोबरच बेंगलोरच्या मक्तेदारादेखील बुधवारनंतर पाडकाम होमार असल्याने यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बुधवारी चिमणीची मुदत संपणार, गुरुवारी चिमणीचे काय होणार? याकडे व्यापा-यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या