23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरचैत्री एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपुजा संपन्न

चैत्री एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपुजा संपन्न

एकमत ऑनलाईन

पंढरपूर/प्रतिनिधी
चैत्रीशुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपुजा मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्याहस्ते करण्यात आली. तर श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदीर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.
चैत्री एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभा-यात द्राक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली आहे .

मंदीर समितीच्या वतीने एकादशी निमित्त पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांसाठी खिचडी, आणि चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. नित्यपूजेस मंदीर समितीचे सहध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य माधवी निगडे, शकुंतला नडगिरे यांच्यासह मंदीर समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या