23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeसोलापूरटायर निखळल्याने एसटीची दुचाकीला धडक

टायर निखळल्याने एसटीची दुचाकीला धडक

एकमत ऑनलाईन

सांगोला– भरधाव एसटी बसचे पाठीमागील टायर निखळून थेट दुचाकीला धडकून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. चालक, वाहकाने जखमींना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने वेळ आली होती पण काळ आला नव्हता असाच प्रकार जखमींच्या बाबतीत घडला.
हा अपघात ५ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास महूद-सांगोला रोडवरील महाजन फाट्याजवळ घडला. संदिपान कोंडीबा नरळे व अनिकेत महादेव नरळे (दोघेही रा. परियंती-म्हसवड, ता. माण, जि.सातारा) अशी जखमींची नावे आहेत.
जखमी संदिपान नरळे व अनिकेत नरळे हे एम. एच. ११/ बी एक्स ८०७४ या दुचाकीवरून महूदमार्गे शिवणे
येथील नातेवाईकाच्या लग्नासाठी निघाले होते, तर अकलूज डेपोची एम. एच. ०६/ एस ८०८३ अकलूज सांगोला ही बस भरधाव वेगाने महूदकडून सांगोल्याकडे  जात असताना महाजन फाट्याजवळ बसच्या डावीकडील बाजूचा एक टायर अचानक निखळला. यामुळे समोरून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून धडकून हा अपघात घडला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या