28.3 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeसोलापूरट्रेनिंग न देताच प्रमाणपत्र विकले; दोघांवर गुन्हा दाखल

ट्रेनिंग न देताच प्रमाणपत्र विकले; दोघांवर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

सोलापूर :अवघ्या आठ दिवसांत कोणताही टायपिंगचा कोर्स न करता मराठी टायपिंगचे प्रमाणपत्र चार हजारात देणाऱ्या दोघांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जोडभावीचे पोसई चक्रधर ताकभाते यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून एविस संगणक सेंटरचे अविनाश उत्तरेश्वर मठपती, श्रावणी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

विजापूर रोडवरील आयटीआय पोलिस चौकीच्या जवळ असलेल्या संगणक सेंटरमध्ये महाराष्ट्र ज्ञान

मंडळ, पुणे अर्थात एमकेसीएलची टायपिंगचे प्रमाणपत्र कोणताही कोर्स न करता मिळत असल्याची तक्रार पोलिस आयुक्त कार्यालयाकडे आली. या माहितीच्या आधारे विशेष पोलिसांचे पथक बनवून पोलिसांनी बनावट ग्राहक बनत ते एविस कॉम्प्युटर सेंटर गाठले. बनावट ग्राहकाने तेथील श्रावणी पाटील यांना नोकरीसाठी मराठी प्रमाणपत्र लागणार आहे असे सांगितले.

तेव्हा पाटील यांनी ४ हजार रुपये मागितले. २ मार्च रोजी दोन हजार आणि ३ मार्च रोज २ हजार रुपये बनावट ग्राहकाने दिले. त्यानंतर त्यांनी ६ मार्च रोजी येण्यास सांगितले. ६ मार्च रोजी पाटील यांनी एमकेसीएलचे कॉम्प्युटर टायपिंग स्पीड टेस्ट मराठी ९८ टक्के तंतोतंतपणा असलेले तसेच ३७ टक्के शब्द प्रति मिनिट वेगाचे एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या सही व शिक्क्याचे प्रमाणपत्र दिले.

आरोपींनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी एमकेसीएलची फसवणूक केल्याप्रकरणी अविस कॉम्प्युटरचे अविनाश मठपती, श्रावणी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सपोनि देशमुख करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या