26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूरडॉ. स्वाती आनंद यांच्या गुलमोहर कादंबरीस राष्टीय स्तरावरील संत नामदेव साहित्य पुरस्कार...

डॉ. स्वाती आनंद यांच्या गुलमोहर कादंबरीस राष्टीय स्तरावरील संत नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/बार्शी
बार्शी येथील लेखिका डॉ.स्वाती आनंद यांच्या गुलमोहर कादंबरीस राष्ट्रीय स्तरावरील संत नामदेव पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार समुध्दी प्रकाशन संस्थेच्यावतीने देण्यात येणार आहे.डॉ.स्वाती यांचे नाव डॉ.स्वाती आनंद वणवे आहे परंतू साहित्य क्षेत्रात डॉ.स्वाती आनंद या नावाने त्या प्रसिद्ध आहेत.

डॉ.स्वाती यांना शालेय जीवनापासूनच वाचनाची अन लेखनाची आवड होती.त्यांचे शालेय शिक्षण बार्शीच्या सुलाखे हायस्कूल येथे तर विद्यालयीन श्री.शिवाजी महाविद्यालय व मेडिकल शिक्षण सातारा येथे झाले आहे,सध्या त्या बारामती येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत.डॉ.स्वाती यांचे वडील मुरलीधर जाधवर बार्शीच्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत होते तर आई कै.ंिसधू मुरलीधर जाधवर या जिल्हा परिषद शाळा खांडवी येथे मुख्याध्यापिका होत्या.यापूर्वीही डॉ.स्वाती आनंद यांच्या स्वप्नफुलें या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय स्वदेशी भारत सन्मान उत्कृष्ट काव्यसंग्रह हा पुरस्कार मिळाला आहे.

अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे यांनी देखील उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.एस.पी ज्वेलर्सचा उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष गुणगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे.राज्यस्तरीय १२ पुरस्कार त्यांच्या नावे आहेत.शंभरहून अधिक लेखक आणि वाचकांनी गुलमोहर कादंबरीवर समीक्षा,परिचय लिहला असून अल्पावधीतच गुलमोहर कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली आहे.गुलमोहर कादंबरीचे मुखपृष्ठ चित्रकार अरंिवद शेलार यांनी साकारले असून,सकाळ यिन बझचे संपादक प्रसिद्द लेखक संदीप काळे यांनी प्रस्तावना लिहिली आहे.कादंबरीमध्ये रंजक, भावुक, तरल, प्रेमकहाणीची भेट दडलेली आहे.
जळगाव येथे जानेवारीत होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा शब्द माऊली पुरस्कारही डॉ.स्वाती आनंद यांना मिळाला आहे.डॉ.स्वाती या मराठी कवी लेखक संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष देखील आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या