23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसोलापूरतरुणाला लाकडी दांडग्याने मारहाण,चौघांवर गुन्हा

तरुणाला लाकडी दांडग्याने मारहाण,चौघांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर: तुम्ही दोघे माझ्या बहिणीला का त्रास देता, असे विचारल्याच्या रागातून चार जणांनी मिळून तरुणाला लाकडी दांडग्याने मारहाण केल्यामुळे तरुण जखमी झाला आहे. याबाबत प्रशिक चंद्रकांत रणखांबे ( वय १८, रा. गरिबी हटाव, झोपडपट्टी क्रमांक १ विजापूर नाका) याने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आयटीआय कॉलेजच्या परिसरात फिर्यादी प्रशिक रणखांबे हा आरोपी अविनाश वाघ व अभी जाधव या दोघांना तुम्ही दोघे माझ्या बहिणीला त्रास का देता, असे विचारले. या रागातून अविनाश आणि अभी या

दोघांनी मिळून फिर्यादीला

लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तेथे पडलेल्या लाकडाच्या दांडक्याने फिर्यादीच्या पाठीत व दंडावर मारत त्याला जखमी केले. शिवाय आरोपी यश माशाळ व त्याच्या साथीदार ( सर्व सेटलमेंट) या दोघांनी मिळून तू माझ्या मित्राच्या नावाने कॉलेजमध्ये तक्रार करतो का, असे म्हणत त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये फिर्यादीचा मोबाईल फुटून त्याचे नुकसान झाले, अशी फिर्याद रणखांबे याने दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या