24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरतांदुळवाडीत राजू शेट्टींच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा

तांदुळवाडीत राजू शेट्टींच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी / कुर्डूवाडी :
तांदुळवाडी (ता.माढा) येथे ५ डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खा.राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ परबत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तांदुळवाडी हे चळवळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या गावात भव्य शेतकरी मेळावा घेण्याबाबत शेतकरी वर्गातून मोठी मागणी होत होती. त्याअनुषंगाने संघटनेचे संस्थापक माजी खा. राजू शेट्टी यांनी मेळाव्यास मान्यता दिली. शेट्टी हे शेतक-यांच्या विविध प्रश्नाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. विशेष करून ऊसदर. सोलापूर जिल्हा सध्या ह्लऊसदरह्व देण्यामागे मराठवाड्याहून मागे आहे.

त्यामुळे शेतक-यांमध्ये मोठा असंतोष व नाराजी आहे. शेतकरी आर्थिक संकटात असतानाही महावितरणकडून बेकायदेशीरपणे वीज तोडण्याचे काम सुुरू आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये महाविकास आघाडी सरकाराबाबत प्रचंड असंतोष आहे. कर्जबाकीदार शेतक-यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान व दोन लाख रुपयांवरीलची थकीत कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली आहे. विमा कंपनीकडून शेतक-यांची होणारी लूट अशा विविध प्रश्नाबाबत माजी खा. शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.

पंचक्रोशीतील शेतक-यांनी व तरुणांनी या शेतकरी मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष परबत यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला माढा तालुका अध्यक्ष सत्यवान गायकवाड, प्रताप पिसाळ,दिलीप गवळी, दिनेश गाडेकर,चंद्रकांत कुटे, हर्षल पाटील, व्यंकट हेगडकर, दत्तात्रय नरुटे,मालोजी आडकर सर, संभाजी पाटील,परमेश्वर माळी,अतुल कदम,वैभव देशमुख शाहीर गोफणे,विष्णू दळवी,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या