27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeसोलापूरतीन वित्तीय संस्था स्थापून नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक

तीन वित्तीय संस्था स्थापून नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक

एकमत ऑनलाईन

लुकाप्रतिनिधी/बार्शी
शहरातील उपळाई रस्त्यावर विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा.लि.,अलका शेअर सर्व्हिसेस,जे.एम.फायनान्सियल सर्व्हिसेस अशा तीन वित्तीय संस्था करुन नागरिकांना शेअरमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून बार्शी शहर पोलिस ठाण्यात दोन महिलांसह पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अंबादास फटे,राधिका विशाल फटे,अंबादास गणपती फटे,वैभव अंबादास फटे,अलका अंबादास फटे(सर्व रा.अलिपूर रोड,माऊली चौक बार्शी)अशी तीन कंपन्यांच्या गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.

दीपक बाबासाहेब अंबारे(रा.शेळके प्लॉट,गाडेगाव रोड बार्शी)यांनी फिर्याद दाखल केली ही घटना 2019 पासून 9 जानेवारी 2021 दरम्यान घडली.विशाल फटे याचे मोहिते कॉम्प्लेक्स येथे नेट कॅफे होते पीक विम्यासंदर्भात त्याची ओळख झाली होती त्यावेळी त्याने शेअर मार्केट मधूून मिळालेला फायदा दाखवला तो फायदा पाहून 70 हजार गुंतवले होते. त्यावेळी फायदा करुन दिला होता.

तीन स्थापन केलेल्या कंपन्यांमधून व्यवहार करुन शेअर्स मार्केटमध्ये शेअर्स घेण्याकरिता मोठ्या रकमा या कपन्यांच्या खातेवर घेत असे गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवीत होता आरटीजीएस व धनादेशद्वारे तसेच रोखही रक्कम स्विकारत होता. माझा व्यवहार डिमीट अकौंटमार्फत केला नाही व्यवहार विश्वासावर होता नागरिकांना परतावा रोखकिंवा धनादेशाद्वारे देत असल्याने विश्वास संपादन केला होता शेअर मार्केटमधील आय.पी.ओ.ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असून महिन्यातून दोन तीन वेळा असते 15 ते 20 टक्के नफा होत असतो महिन्यास गुंतवलेल्या रकमेवर 30 ते 35 टक्के नफा मिळत असलेबाबत शेअर मार्कट मधील अल्गो ट्रेडिंग ही संकल्पना त्याने तयार करुन ट्रेडिंगचा अभ्यास असल्याचे भासवले.

बार्शी शहर व परिसरातील नागरिकांना ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दररोज दोन टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते आमिषाला बळी पडून माझे,भावाचे,नातेवाइकांकडून हात उसने पैसे घेऊन विशाल फटे याच्या तीन कंपन्यांच्या खात्यामध्ये तसेच गुंतवणूक केली तसेच बचत खात्यामध्येही रक्कम जमा केल्या होत्या. एका वृत्तवाहिनीने विशाल फटे याचा 27 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय मंर्त्यांच्या हस्ते बेस्ट टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट इन अल्गो ट्रेडिंग इन इंडिया हा पुरस्कार देऊन सन्मानीत केले होते त्यामुळे अनेक नागरिकांनी विश्वास ठेवून कोट्यवधी रुपयांची रक्कम विश्वासाने गुंतवणूक केली होती.
आम्ही सर्वांनी एकूण 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपये गुंतवणूक केली होती. मोबाईलमध्ये व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर संदेश टाकून त्याने 10 लाख गुंतवल्यास वर्षभर परतावा न देता वर्षाअखेरील 6 कोटी रुपये देण्यात येतील. मर्यादित सभासद घेणार असल्याचे पत्रक काढून त्याचा परतावा देतो असे सांगून गुंतवणूक रकमेचा अपहार केला आहे. वित्तीय अस्थापनांचे संचालक यांनी संगनमताने ठकवणूक केली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी फसवणूक, ठकवणूक,विश्वासघात,महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे सरंक्षण अधिनियम यानुसार गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणासही अटक केलेली नाही. तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या