31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeसोलापूरदारुच्या नशेत भाच्याने घरी नेऊन मामाला बदडले

दारुच्या नशेत भाच्याने घरी नेऊन मामाला बदडले

एकमत ऑनलाईन

मोहोळ: दारू पिलेल्या भाच्याने वृद्ध मामाला त्याच्या घरी मासे खाण्यासाठी नेले आणि मासे पातेल्यात नसल्याने मामालाच गंभीर जखमी करून बेशुद्ध पडेपर्यंत ठोकले हा प्रकार मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी या गावी घडला याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश विलास क्षीरसागर याने त्याचा मामा रोहिदास दगडू हेळकर (वय७७) यास आईने रात्री माशाचे कालवण केले आहे चल आपण दोघे मिळून खाऊ असे म्हणून असे म्हणून भाचा गणेश हा मामाला घरी घेऊन . त्यावेळी गणेश हा दारू प्यालेला होता .

घरामध्ये जाऊन माशाचे कालवण आणतो असे म्हणून कालवण आणण्यासाठी आत आला असताना पातेल्यामध्ये मासे दिसले नाहीत . मासे कोणी खाल्ले असे म्हणत गणेश हा शिवीगाळ करू लागला त्यावेळी गणेश यास मामाने राहू दे मासे खाल्ले असतील असे म्हणत समजावण्याचा प्रयत्न केला व मामा बाहेर जावं लागला तेव्हा गणेश याने हातातील कुऱ्हाडीने मामाच्या डोक्याला मारले व गंभीर जखमी केले . त्यानंतर गणेश यांने कुऱ्हाड बाजूला फेकली व दांड्याने मामाला छातीवर पाठीवर ऊजव्या खांद्यावर जोरात मारू लागला यात मामा जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला .हा प्रकार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला होता .त्यानंतर संध्याकाळी गणेश ची आई कामावरून आली असता तिने त्यास उठवले तेव्हा मामाने घडला प्रकार आपल्या बहिणीस सांगितला तेव्हा मामाने त्याचा मुलगा ज्ञानेश्वर यास बहिणीच्या घरी बोलवून सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर जखमी रोहिदास दगडू हेळकर वय ७७ यांनी आपला भाचा गणेश विलास क्षीरसागर यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली .

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या