22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरदीड वर्षानंतर शाळांमध्ये किलबिलाट

दीड वर्षानंतर शाळांमध्ये किलबिलाट

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णयशासनाने घेतला. यापार्श्वभूमीवर विविध नियम व अटींच्या अधीन राहून मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्यास अनुमती दिल्यावर बुधवारी शाळांमध्ये किलबिलाट पहावयास मिळाला. तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर कालपासून जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी शाळांना भेटी देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

काल सकाळपासूनच त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी, धोत्री व ंिदडूर या गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी, कन्नड, उर्दू माध्यमांच्या शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या चेह-यावरील आनंद पाहून त्यांनाही आनंद झाला. शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत प्रत्येक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. काही शाळांमध्ये शिक्षणाधिका-यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली होती. त्या फेरीमध्येही ते सहभागी झाले. धोत्री येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून बॅग आणि पाणी पिण्यासाठी बाटली वाटप करण्यात आले. शाळांमध्ये राबविण्यात आलेले उपक्रम, शाळा बंद असताना करून घेतलेली रंगरंगोटी, स्वच्छता आणि सुशोभीकरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

श्रीदत्त मराठी विद्यालयात विद्यार्थ्यांचे उस्फुर्त स्वागत निलम नगर भागातील श्रीदत्त मराठी विद्यालयांमध्ये आज शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यावेळी शाळा फुलांनी व फुग्यानी सजवण्यात आली होती दोन वर्षानी शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेर्ह­यावर आनंदी भाव दिसत होते विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता चंद्रकांत शिवपुजे यांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

शासन आदेशानुसार बुधवार दि.1/12/2021 रोजी इयत्ता पहिली ते सातवी चे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले यावेळी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे व सुरक्षित अंतर ठेवावे अश्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आले . सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत आल्यावर ऑक्सीजन व टेंपरेचर मशीन द्वारे तपासणी करण्यात आली यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या