पंढरपूर/ प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील नारायणचिंचोली येथे गुरुवार १४ एप्रिल सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवार सकाळी आठ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सलग बारा तास बंद असल्यामुळे ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झालेला आहे त्यातच सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून त्या ताई अभ्यास करण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे वयोवृद्ध लोकांनाही या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना या भर उन्हाने त्रस्त केले असतानाच पंढरपूर तालुक्यातील नारायणचिंचोली येथे गुरुवारी १४ एप्रिल सायंकाळी सहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा भारनियमा व्यतिरिक्त सलग येथील महावितरणच्या अधिका-यांच्या दुर्लक्ष पणामुळे जवळपास बारा तासाहून अधिक वीज पुरवठा खंडित झाल्याने नारायणचिंचोली गावातील नागरिकांमधून व ग्राहकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे नारायणचिंचोली हे गाव तुंगत मंडल अंतर्गत येत असून या मंडळांतर्गत असणारे वरिष्ठ अधिकारी या वारंवार होणा-या खंडित वीजपुरवठा कडे दुर्लक्ष करत आहेत.
या गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा लेखी व तोंडी या अधिका-याकडे तक्रारी केल्या असल्या तरी जाणीवपूर्वक या अधिका-यांकडून या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्राहकांमधून बोलले जात आहे व आपलाच मनमानी कारभार करत जेव्हा जाईल तेव्हा जाईल येईल तेव्हा येईल अशा परिस्थितीत बंद पडलेला वीजपुरवठा तात्काळ सुरू न करणे ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे असे वारंवार प्रकार या महावितरणच्या अधिका-यांकडून घडताना दिसत असल्याचे बोलले जात आहे मात्र नैसर्गिक संकट असले तरी चालेल परंतु मानवी संकटामुळे निर्माण झालेल्या या महावितरणच्या गलथान कारभाराकडे तुंगत मंडल अधिका-यांच्या वरिष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आह.
नारायणचिंचोली ग्रामस्थ यापुढे विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा काही सामाजिक संघटनेने दिला आहे. भारनियमन व्यतिरिक्त खंडित होणारा वीजपुरवठा महावितरणने तात्काळ सुरू करण्याचे गरजेचे असते मात्र नारायणचिंचोली तुंगत मंडल महावितरणच्या अधिका-यांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे आतातरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी घडलेल्या प्रकाराची दखल घेत महावितरणच्या अधिर्कायांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व ग्राहक वर्गातून होत आहे.