19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसोलापूरनीरा नदीवरील अकलाई बंधारा ते दर्गा रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर :...

नीरा नदीवरील अकलाई बंधारा ते दर्गा रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

एकमत ऑनलाईन

तालुका प्रतिनिधी / इंदापूर
इंदापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणारे लुमेवाडी येथील हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी दर्गाहला येणा-या भक्त गणांसाठी व या परिसरातील नागरिकांसाठी ये जा करण्यासाठी नीरा नदीवरील अकलाई बंधारा ते दर्गा रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
लुमेवाडी येथे हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या उरुसानिमित्त राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दर्शन घेतले. यावेळी उपस्थित विश्वस्त नागरिक यांच्याशी संवाद साधताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.

लुमेवाडी गावातील नागरिकांनी रस्त्यासाठी निधीची आवश्यकता आहे म्हणून, अनेक वेळा माझ्य्ाांकडे पाठपुरावा केला. या कामाला निधी दिला जाईल असा शब्द मी दिला होता. त्याप्रमाणे निधी मंजूर करत आहे. या परिसरात लागणा-या सर्व सुखसुविधा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात काम करणार आहे. हाफिज साहेब बाबावर माझी व माझ्या कुटुंबाची श्रद्धा असून, सतत आम्ही दर्शनासाठी येत असतो. नीरा नदीवरील पंचवटी बंधारा ते दर्गा व अकलाई बंधारा ते दर्गा हे रस्ते अनेक वर्षापासून प्रलंबित होते. निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे नागरिकांनी स्वत: लक्ष घालून दर्जेदार काम करून घ्यावे असेही आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

हा निधी ग्रामविकास खात्याच्या ३०५३ रस्तेदुरुस्ती कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे. इंदापूर तालुका व माळशिरस तालुका या दोन्ही तालुक्यांचा समन्वय या नव्या होणा-या रस्त्यामुळे अत्यंत जवळचा होणार आहे. अकलूज शहरासाठी मोठी बाजारपेठ लुमेवाडी परिसराला या निधीच्या माध्यमातून वरदान ठरणार आहे. आगामी काळात या गावाला अधिकचा निधी देऊन सर्व सुख सोयी सुविधा युक्त लुमेवाडी गाव निर्माण करू असाही शब्द राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या