29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeसोलापूरपत्नीच्या आजाराला कंटाळून शेतक-याने केली आत्महत्या

पत्नीच्या आजाराला कंटाळून शेतक-याने केली आत्महत्या

एकमत ऑनलाईन

बार्शी : पत्नी आजारी असल्याने त्या टेन्शनमध्ये एका शेतक-याने स्वत:च्या शेतातील ंिलबाच्या झाडाला सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेपूर्वी चिखर्डे (ता. बार्शी) येथे घडली आहे.

हनुमंत दिगंबर वाघमारे (वय ४३, रा. चिखर्डे) असे त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुलगा तुषार हनुमंत वाघमारे (वय २२) यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. हनुमंत वाघमारे हे शेतामध्ये कामानिमित्त गेले होते.

त्यांची पत्नी साधना या पंधरा दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर बार्शीच्या खाजगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान तुषार याचे मित्र निहाल मुलानी यांनी फोन करून तुझ्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे कळविले.

तेव्हा तुषार याने शेतात जाऊन पाहिले असताना शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेतल्याचे दिसले. पत्नी आजाराचे टेन्शन घेऊन गळफास घेतल्याचे याबाबत फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल पांडुरंग मुंडे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या