22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरपारे येथील पशुवैद्यकीय दवाखाना वा-यावर ; पशुधन अधिकारी फक्त नावाला, डॉक्­टर नाही...

पारे येथील पशुवैद्यकीय दवाखाना वा-यावर ; पशुधन अधिकारी फक्त नावाला, डॉक्­टर नाही कामाला

एकमत ऑनलाईन

विकास गंगणे / सांगोला :
सांगोला तालुक्यातील पारे येथील श्रेणी १चा पशुवैद्यकीय दवाखाना अनेक वर्षापासून नियमित वैद्यकीय अधिका-यांच्या प्रतीक्षेत आहे. पारेसह परिसरातील शेतक-यांच्या गुरांना यामुळे वेळेवर उपचार मिळत नसल्याने हा दवाखानाच आजारी झाला आहे. पशुसंवर्धन खात्याच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून पशुधन बाळगणा-यांच्याचिंतेत भर पडली आहे. कायमस्वरूपी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी मिळविण्यासाठी अजून किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-यांचे पशुधन वाचविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. पण याच शासनाच्या विविध प्रयत्नाला खोडा घालण्याचे कार्य खुद्द सांगोला तालुक्यात होताना दिसत आहे. शेतक-याचे पशुधन वाढविण्यासाठी शासन विविध प्रोत्साहन पर योजना राबवित आहे,पण गेली पाच सहा वर्षांपासून तालुका पशुवैद्यकीय अधिका-यांच्या दुर्लक्षपणामुळे पारे गावातील पशुवैद्यकीय दवाखाना कुलूप बंद अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. पशुवैद्यकीय अधिका-यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,कधी त्यांचा फोन लागत नाहीकिंवा लागला तर शेतक-यांना उपदेशाचे डोस ऐकावे लागत आहेत,या सर्व कारणांमुळे या विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. मात्र भले मोठे राजकीय वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे,आपले कोणीच काही करू शकत नाही, असा आव आणणा-या अधिकारी व कर्मचारी या विभागात वावरताना दिसत आहेत .

पारे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था झाल्याने, दवाखाना अडगळीचे ठिकाण बनले आहे. सतत कुलुपबंद असलेल्या दवाखान्याचे आवारात दुरावस्था झाली असुन,परिसरात गवत वाढल्याने हे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.विशेषत: शासनाने लाखो रुपये खर्च करून या दवाखान्याची भव्य दिव्य इमारत उभी केली आहे.मात्र सध्या दवाखान्याला उतरती कळा लागली आहे . विशेषत: पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना बियाणे, जनावरांचे रेतन, शस्रक्रिया, तपासणी, उपचार आदी सुविधा दिल्या जातात.

शासनाच्या वतीने जनावरांसाठी अल्पदरात तसेच मोफत सुविधा दिल्या जातात. जनावरांच्या र्चा­यासाठी मका, कडवळ आदी बियाण्यांचा पुरवठा केला जातो. शेतर्क­यांनी तयार केलेल्या गटांनाही विभागाकडून सेवा तसेच, साधनांचा पुरवठा केला जातो. मात्र येथुन पशुपालक शेतर्क­यांना सुविधा मिळणे मुश्किल झाले आहे. पशुपालक अनेक सुविधांपासुन वंचित असल्याचा प्रकार समोर येत आहे.इतके च नाही तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे औषधे उपलब्ध नाहीत .या भागातील डिकसळ ,नराळे ,हबिसेवाडी सह पारे परिसरातील गावातही विभागाच्या योजना पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत.विशेषत: या ठिकाणी एक अधिकारी व एक कर्मचारी कार्यरत आहेत .सांगोला तालुक्यात अनेक ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक व कर्मचारी कामावरच येत नसुन कागदावरच योजना राबविल्या जात असल्याचा प्रकार सर्रासपणे घडत आहे.

काही दवाखान्यात कर्मर्चा­यांच्या निवासस्थानाची सोय केलेली असूनही, कर्मचारी वास्तव्यास राहत नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारून जात असतानाही, दवाखान्यात कोणीच भेटु शकत नाही. पारे हे गाव केंद्रस्थानी आहे. त्यामुळे परिसरातील डिकसळ,नराळे येथील पशुपालक पशुवैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी येथे येत असतात. या दवाखान्याला चार पदे मंजूर झाली पाहिजेत. त्यात एक पशु वैद्यकीय अधिकारी, दोन परिचर, एक वनोपचारक या पदाची आवश्यकता आहे मात्र सद्यस्थितीत या दवाखान्यात एक कर्मचारी तात्पुरत्या स्वरुपात ते त्यांच्या ज्ञानाने उपचार करतात.

विशेषत: एका अधिका-याकडे सोपवला असून, ते महिन्यातून एक-दोन दिवस येतात. परिणामी ५ ते १० किलोमीटरच्या खेड्यावरून उपचारासाठी आणलेल्या गुरांना उपचार मिळणे तर दूरच परंतु स्थानिक शेतक-यांच्या गुरांनाही शासकीय वैद्यकीय सेवेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतक-यांना आपल्या गुरांवर खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून महागडा इलाज करून घ्यावा लागतो. तरी प्रशासनाने त्वरित पशुवैद्यकीय अधिका-यांचे रिक्त पद भरावे, अशी मागणी पशुपालक करीत आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या