29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeसोलापूरबहिणीची साथ, आई वडिलांचे आशीर्वाद स्वत:ची जिद्द व कष्टाच्या जोरावर झाला सुपर...

बहिणीची साथ, आई वडिलांचे आशीर्वाद स्वत:ची जिद्द व कष्टाच्या जोरावर झाला सुपर क्लासवन

एकमत ऑनलाईन

प्रा राजेश गायकवाड/करमाळा
ही यशोगाथा आहे करमाळा तालुक्यातील उमरड येथील गारगुट वाडीच्या तरुण श्री पांडुरंग गोरख चोरमले ची .आई अविधा ,वडील गोरख चोरमले,बहीण पंचाबाई कोकरे, यांच्या सहकार्याने व पत्नी आशा महारणवर हिच्या जोरदार साथीने मी हे यश संपादन केले आहे, असे पांडुरंग चोरमले म्हणाले.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की माझे प्राथमिक शिक्षण गारगुटवाडीत झाले त्यावेळी आमचे वर्ग झाडाखाली भरायचे . तर माध्यमिक शिक्षण वामनराव बदे विध्यालयात झाले .पदवीचे शिक्षण पुणे येथे गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये धातू शास्त्र या विषयामध्ये झाले .आई वडिलांची कठीण परिस्थितीची जाण डोळ्यासमोर ठेवून अपयश ही यशाची पहिली पायरी समजून पाचव्या प्रयत्नात मिळालेले यश हे आकाशाला गवसणी घालणारे मिळाले.

यूपीएससी च्या परीक्षेत २०१८ साली नागरी सेवा मधून भारतीय डाक सेवेत निवड झाली. सध्या कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे वरिष्ठ अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत.

आई वडील अल्पभूधारक असल्याने मोलमजुरी केल्याशिवाय भागत नव्हते . त्यामुळे खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले आणि त्यापायी जमीन विकावी लागली .त्यांची ऐपत नसताना त्यांनी दिलेली साथ खूप महत्वाची आहे .बहिणीने खूप खूप मोठी साथ दिली आहे .माझी मोठी मुलगी तीन वर्षे ची असताना पत्नीने छोटा जॉब स्वीकारून घर प्रपंच सांभाळला पण मला कसलीही अडचण येऊ दिली नाही .घराचा खर्च, माझा खर्च बहिणीने केला. महिन्याला ३ते ४ % व्याजाने घेऊन. मी ह्या सर्व परिस्थिचे भान कदापिही विसरू शकत नाही व विसरणारही नाही .

मी लोकांच्या तक्रारी निवारणासाठी व लोकांना उपलब्ध असण्यावर भर देणार आहे.जेणेकरून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, असे चोरमले म्हणाले. यावेळी संजय घोलप, अशोक गोफणे, आशपाक जमादार आदींनी सत्कार केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या