26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeसोलापूरबारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

बार्शी : कळंब तालुक्यातील देवधानोरा येथून शिकायला आलेल्या विद्यार्थिनीने बार्शीत भाड्याच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सृष्टी संजय बोंदर (वय १८, रा. देवधानोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १० जूनच्या पहाटे घडली. याबाबत बार्शी येथील तिचे नातेवाईक राजेंद्र मुंढे (वय ५२, रा. पवार प्लॉट, उपळाई रोड) यांनी शहर पोलीस घटना ठाण्यात या घटनेची माहिती दिली.

सृष्टी ही बार्शी येथील शिवशक्ती मैदानाच्या मागे ब्रह्मचैतन्य नगरमध्ये खोली भाड्याने घेऊन मैत्रिणींसोबत राहत होती. तिने दिलेल्या बारावी परीक्षेत ८५ ते ९० टक्के गुण पडतील, अशी तिची अपेक्षा होती. भरपूर अभ्यास करूनही तिला ६६ टक्के गुण मिळाल्याने ती नाराज झाली. त्यामुळे तिने खोलीमध्ये कोंडून घेऊन लोखंडी दरवाज्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल घोडके करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या