27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeसोलापूरभरधाव कारच्या धडकेत दोघे ठार

भरधाव कारच्या धडकेत दोघे ठार

एकमत ऑनलाईन

सांगोला : भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात रविवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सांगोला- मिरज रोडवरील गोडसेवाडी येथे घडला.

श्रीकांत दिगंबर मिसाळ (वय ५५ रा. चिणके, ता. सांगोला), भाग्यश्री शंकर माने (वय ६५ रा. चिमटे) असे अपघातामध्ये मयत झालेल्यांची नावे आहेत. अपघातानंतर चालक न थांबताच कारसह सांगोल्याच्या दिशेने पळून गेला.

चिणके येथील श्रीकांत दिगंबर मिसाळ व भाग्यश्री शंकर माने हे दोघेजण रविवारी सायंकाळी एम एच १०-एएन- २४ ५७ या दुचाकीवरून चिणके येथून कमलापूर मार्गे सांगोल्याकडे निघाले होते. त्यांची दुचाकी गोडसेवाडी येथील आदित्य ट्रेडर्ससमोर आली असता त्यावेळेस मिरजकडून पाठीमागून येणा-या अज्ञात भरधाव कारणे त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात श्रीकांत मिसाळ यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर पाठीमागे बसलेल्या भाग्यश्री माने यांनाही गंभीर मार लागल्याने जखमी झाल्या. स्थानिक लोकांनी जखमी भाग्यश्री माने यांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचार करता सांगोला येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. मात्र त्यांचाही मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या