22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरभीमानगर येथे भीषण अपघात पाच ठार; सहा जण जखमी

भीमानगर येथे भीषण अपघात पाच ठार; सहा जण जखमी

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी / टेंभुर्णी :
सोलापूर -पुणे महामार्गावरील भिमानगर (टें)येथे सरदारजी ढाब्यासमोर ट्रक व टँकर यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघात ५ ठार तर ६ जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री ११:३० वा. च्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की ट्रक क्रमांक (एम. एच.२५-४०४५) हा सोलापूर हून पुण्याकडे तांदूळ घेऊन निघाला होता सदर ट्रक भिमानगर ता. माढा. येथे आला असता भीमनगर येथे रस्त्याचे काम सुरू होते परंतु सदर काम करणा-या ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक न लावल्यामुळे रात्री अचानक रस्ता बंद केल्यामुळे ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला व सदर टँकर पुण्याहून सोलापूर कडे निघालेला टँकर क्रमांक (एम. एच.- १४ सीपी- ४०२०) ट्रक पलटी झाला.

तसेच ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात टँकर ही झाडावर जाऊन आदळला यामध्ये चालक शंकर कवडे (वय-४०) रा. श्रीपुर. ता. माळशिरस. तर ट्रक चालक शिवाजी नामदेव पवार (वय.३०) रा. सालेगाव ता. उमरगा ट्रक मधील प्रवासी व्यंकट रामाण्णा दंडगुडे, (वय-४५) रा. सालेगाव उमरगा किसन रामलू राठोड (वय-४५ ) रा. सालेगाव ता. उमरगा सोमनाथ लक्ष्मण माळी रा. मोहोळ असे ५ मयत असून. तसेच दत्ता अशोक घंटे (वय-२९) रा. सालेगाव ता. उमरगा व्यंकूंिसग रतनंिसग राजपूत (वय-६६) रा. केसरजवळगा ता. उमरगा गौरी दत्ता राजपूत रा. पुणे. मीनल दत्ता राजपूत रा. पुणे. धीरज दत्ता राजपूत (वय-१२) रा. पुणे. असे ६ जण जखमी असून सदर चा अपघात रोडचे काम करणा-या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याची खबर कृष्णदेव कांतीलाल केदार (वय -३५) रा. कन्हेरगांव यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली.

त्यांच्या माहितीवरून रोड मेंटेनेस चे ठेकेदार व निष्काळजीपणे चालवून पाच जणांचा मृत्यू कारणीभूत ठरल्यामुळे दोन चालकांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातस्थळी सोलापूरचे अप्पर पोलीस निरीक्षक हिम्मत जाधव व करमाळा उपविभागाचे अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी भेट दिली सदर अपघात स्थळावर मृतदेह व वाहने बाजूला करण्यासाठी तसेच जखमींना दवाखान्यात पोहचवण्यासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश ंिनबाळकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद पोलीस हवालदार गुटाळा, पोलीस हवालदार तांबोळी, पोलीस नाईक शेख, पोलीस नाईक झोळ पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी तसेच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे व इंदापूर पोलिस ठाण्याचे इतर अंमलदार व पोलीस मित्रांनी मदत केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या