27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरलग्नाच्या घरात नातेवाइकांनी चोरले लाख रुपयांचे दागिने

लग्नाच्या घरात नातेवाइकांनी चोरले लाख रुपयांचे दागिने

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सैफुल येथील स्वामी विवेकानंद नगरातील सुवर्णा वाघमोडे यांच्या घरात लग्नकार्य होते. यासाठी नातेवाईक जमले, त्यातीलच एका नातेवाइकांनी एक लाख रुपयांचे दागिने चोरल्याची फिर्याद विजापूर नाका पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे.

सुवर्णा अप्पासाहेब वाघमोडे (४३) यांच्या मुलीचे लग्न होते. त्यामुळे त्यांच्या घरी नातेवाईक व पाहुणे मंडळी जमले होते. सुवर्णा यांच्या पतीच्या मामाची मुलगी उज्ज्वला वाघमोडे हीसुद्धा आली होती. या लग्नकार्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामध्ये वधूचे तीन तोळ्याचे गंठण, कानातील फुले, झुबे असे एक लाख आठ हजार रुपयांचे दागिने उज्ज्वला उर्फ पिंकी संजू वाघमोडे, (रा. मौजे भतगुणकी, ता. इंडी, जि. विजापूर) यांनी चोरल्याची फिर्याद सुवर्णा वाघमोडे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली.

फिर्याद दिल्यावरून उज्ज्वला वाघमोडे हिच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक गवळी हे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या