22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरलसीचे प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर प्रमाणपत्राशिवाय कर्नाटकातील प्रवाशांना बंदी : मनिषा आव्हाळे

लसीचे प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर प्रमाणपत्राशिवाय कर्नाटकातील प्रवाशांना बंदी : मनिषा आव्हाळे

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी / सोलापूर :
ओमिक्रॉन विषाणुच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी अक्कलकोट, दुधनी, सीमावर्ती परिसरात चेकपोस्ट उभारण्यात आले असून दोन लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय कर्नाटक राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार नाही. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली असून अक्कलकोट व द. सोलापूर तालुक्यात लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. या दोन्ही तालुक्यात जवळपास ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सींग व लसीकरण या त्रिसुत्रीच्या आधाराने ओमिक्रॉनच्या प्रसाराला आळा घालता येउ शकेल असे उपविभागीय अधिकारी मनिषा आव्हाळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
पदभार घेतल्यापासून प्रशासकीय कामकाजाला गती दिली असून आरटीएसच्या ९० केसेसेचा निकाल दिला आहे. अक्कलकोट व द. सोलापूर तालुक्यात अवैद्य वाळू चोरी नियंत्रणासाठी फिरती पथके कार्यान्वित केली असून दोन तलाठयावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.

याबरोबरच पोलिस पाटील, कोतवाल आदींची सहकार्य घेउन वाळू तस्करीला आळा घालण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे त्या म्हणाल्या. द. सोलापूर व अक्कलकोट तालुका हा सीमावर्ती परिसर असल्यामुळे कर्नाटक राज्यातील सीमावर्ती परिसरातील प्रशासनाशी समन्वय साधत वाळू चोरीच्या प्रतिबंधासाठी पावले उचलली जात आहेत. मंद्रुप एमआयडीसीसाठी शेतक-यांना भूसंपादनचा मोबदला वाढवून हवा आहे. सद्यस्थितीत मंद्रुप एमआयडीसीच्या संदर्भातील प्रक्रिया औद्योगिक विकास महामंडळ स्तरावर कार्यरत आहे. कर्नाटक राज्यातून येणा-या प्रवाशांवर करडी नजर ठेवली जात असून कर्नाटकातून येणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या बस व खाजगी बसमधील प्रवाशांचीही लसीच्या प्रमाणपत्राची तपासणी होत आ.हे.

सीमावर्ती भागात उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यांच्या माध्यमातून ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस घेण्यासाठी प्रशासन नागरिकांना उद्युक्त करत असुन घरोघरी फिरत्या पथकामार्फत दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात लसीकरण केले जात आहे. आवश्यक ते समुपदेशन नागरिकांना करण्यात येत आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी पोलिस व महसुल विभागातर्फे संयुक्त प्रयत्न केले जात आहेत असेही मनिषा आव्हाळे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या