26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूरवंचितचे मोहोळ तहसीलसमोर आंदोलन

वंचितचे मोहोळ तहसीलसमोर आंदोलन

एकमत ऑनलाईन

तालुका प्रतिनिधी / मोहोळ :
मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे. विधान भवनावर मोर्चा काढुन न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर मोहम्मद बिल पास करावे या व इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंर्त्यांपर्यंत पोहचविण्यात आले होते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून मुस्लिम समाजाच्या संवैधानिक हक्क अधिकारांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक वंचित बहुजन आघाडीने दिली आणि आज मोहोळ तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनातील प्रमुख मागण्या न्यायालयाने मान्यता दिलेले 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.

धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणा-यांना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, ते बिल येणा-या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करून इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हजÞरात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे. संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याच्या ह.भ.प. कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.सारथी- बार्टी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी मोहोळ तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले व मोहोळ तहसीलदारांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मोहोळ तालुका अध्यक्ष राजेंद्र आवारे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कांबळे, जिल्हा सचिव प्रकाश सोनटक्के,तुकाराम पारसे, मोहोळचे माजी सरपंच हाजी बिलाल शेख,अभय बंडगर,सचिव अमोल विटकर ,सचिन गवळी,शशिकांत सोनवणे,विशाल विटकर, अजय पवार, अशोक पाटील, ज्ञानेश्वर घाडगे, अनिल वाघमारे सिद्राम वाघमोडे, सुधाकर उघडे, ब्रम्हदेव गावडे, सुजीत लोंढे, हणमंत खांडेकर, अनिल साबळे, रामा गाडे, अंकुश शेंडगे,फुलचंद सरवदे, लखन घाटे, बंडू कारंडे, बालाजी कोकरे, श्रीकांत जवंजाळ, सतिश आवचारे, संदेश आवचारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या