24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरविद्यालयाच्या शौचालयात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

विद्यालयाच्या शौचालयात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/मलिकपेठ
मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील एका सतरा वर्षीय बारावीच्या विद्यार्थ्याने शौचालयाच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटन काल सोमवारी (ता. 29) रात्री आठ वाजता घडली.

देवानंद ज्ञानेश्वर भोसले असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून, त्यास आत्महत्येस प्रवृत्त कोणी केले? आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी तक्रार मृत देवानंदच्या नातेवाइकांनी केली. खरा प्रकार समजल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका देवानंदच्या आई-वडील व नातेवाइकांनी घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.

आमची दखल घ्या, गरिबाला न्याय द्या, असे म्हणत नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात तसेच पोलिस ठाण्यात आक्रोश केला. यावर अमोल भारती (उपविभागीय पोलिस अधिकारी) म्हणाले, मृत देवानंदच्या सर्व नातेवाइकांचे म्हणणे विचारात घेऊन त्यांच्या ज्या काही शंका असतील त्यांचे निरसन करू. शवविच्छेदन अहवाल आल्यावरच आत्महत्या नेमकी कशामुळे केली हे समजू शकेल. प्रथमदर्शनी त्याच्या शरीरावर कुठल्याही जखमा दिसत नाहीत. तपास योग्य पद्धतीने करून मृत देवानंदला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. संतप्त होऊन नातेवाईकांनी सकाळी थोडावेळ मुख्य रस्ता रोखून धरला होता. प्रशासन आणि पोलिसांकडून आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले.

प्रकरणी राजेंद्रप्रसाद विष्णुपंत नाडगौडा यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून, तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर करीत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवानंद भोसले हा पारधी समाजाचा विद्यार्थी बारावीत शिकत होता. तो खूप हुशार होता. रात्री आठ वाजता सर्व विद्यार्थी भोजनालय कक्षात जेवणासाठी जातात, त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. हजेरी घेताना नेमका देवानंद गैरहजर होता, कुठेही दिसला नाही. शिक्षकांनी चौकशी केली असता तो दिसून आला नाही. मात्र एका सदनातील शौचालय बंद असल्याचे आढळून आले. या शाळेमध्ये सुमारे 350 मुले आहेत. त्यात 205 मुले व 145 मुली आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या