सोलापूर- विजापूर रस्त्यावरील मोरया सोसायटीत वीरेश्वर सिध्दय्या मठ (वय ६०) यांनी अज्ञात कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केली.मोरया सोसायटीतील मठ यांच्या घराच्या आवारात पाण्याची टाकी आहे .
त्या टाकीला लोखंडी अँगल असून मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता वीरेश्वर यांनी त्या लोखंडी अँगलला साडीने गळफास
घेतला. त्यांना बेशुद्धावस्थेत नातेवाइकांनी उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकी झाली आहे.