37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeसोलापूरशेततळ्यात पडून आईसह दोन चिमुकलींचा मृत्यू

शेततळ्यात पडून आईसह दोन चिमुकलींचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

तालुकाप्रतिनिधी/उत्तर सोलापूर
बागायती शेती, शेतात द्राक्ष बाग आणि त्या बागेला पाणी देण्यासाठी शेतात त्यांनी शेततळे तयार केले होते. शुक्रवारी (ता. 21) दुपारी दोनच्या सुमारास द्राक्ष बागेतील पाखरे हाकायला गेल्यानंतर आईसह दोन चिमुकलींचा त्या शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. अक्षय ढेकळे यांचे शेतातच घर असून त्यांची पत्नी सारिका अक्षय ढेकळे (वय 22), गौरी अक्षय ढेकळे (वय 4) आणि आरोही (वय 2) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्यात पाय घसरून मृत्यू झाला की त्यांनी मुलींसह आत्महत्या केली, याचा तपास तालुका पोलिस ठाणे करीत आहे.

शेततळ्यात पडून तिघांचा मृत्यू होण्याची ही जानेवारीतील दुसरी घटना आहे. मार्डी (ता. उत्तर सोलापूर) याठिकाणी काही दिवसांपूर्वी तीन मुलींचा पाय घसरुन मृत्यू झाला होता. त्यांनतर आता पापरी या गावात ही घटना घडली आहे. पापरी येथील दोन आणि चार वर्षांच्या मुलींसह त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी त्यासंबंधीची सखोल चौकशी सुरु केली आहे. त्या तिघींचा पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला की त्यांनी आत्महत्या केली, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दरम्यान, शेतातील बागेत पाखरे राखायला गेल्यानंतर त्या तिघींचा मृत्यू झाल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. त्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आणले आहेत. घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस पथक जाऊन पंचनामा करीत असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली. लोहारा तालुक्­यातील नंदगाव हे मृत सारिका ढेकळे यांचे माहेर आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या