22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरसरकार व महावितरणच्या विरोधात शेतक-यांमध्ये असंतोष

सरकार व महावितरणच्या विरोधात शेतक-यांमध्ये असंतोष

एकमत ऑनलाईन

तालुका प्रतिनिधी / इंदापूर :
इंदापूर तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा, वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने खंडित केल्याने तालुक्यातील शेतक-यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे गेली दहा दिवस झाले वीज तोडणी प्रश्नावर गप्प आहेत, एकही शब्द बोलत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार व महावितरणच्या विरोधात शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. असे प्रतिपादन भाजपा नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील शेतक-यांच्या वीजपुरवठा गेली दहा दिवसांपासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला.आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र दहा दिवस झाले तरी शेतीचा वीजपुरवठा सुरु केला जात नसल्याने भाजपा नेते व मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील महावितरण कार्यालयासमोर शनिवार ( दि. २७ ) नोव्हेंबर पासून शेकडो शेतकरी व कार्यकर्ते यांना सोबत घेवून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी बोलताना माजी मंत्री यांनी पाटील यांनी राज्यमंत्री भरणे यांच्यावर घणाघात केला.

पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये शेतीचा वीजपुरवठा सुरू आहे, मग इंदापूर तालुक्यातील शेतक-यांवर अन्याय का? इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले मंत्री हे वीज पुरवठा सुरु करणेबाबत एकही शब्द बोलत नाहीत, त्यांनी शेतक-यांना वा-यावर सोडल्याने त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री भरणे यांच्यावर वीज खंडित प्रश्नावर भडिमार केला.
मी तुमचाच आहे, काही अडचण असेल तर मी सोडवीन असे तोंडावर गोड बोलणा-या भरणे यांना शेतक-यांचे होणारे नुकसान दिसत नाही का ? लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी ते टाळत आहेत. महावितरणने शेतक-यांना दिलेली बिले जास्त आलेली असून अनेक हॉर्स पावरने वाढवून दिलेली आहेत. त्यामुळे चुकीची दिलेली बिले दुरुस्त करावीत व बिल दुरुस्तीसाठी कक्ष उघडावेत. शासनाने वीज बिलामध्ये मोठी सवलत द्यावी व सवलत देय रक्कम भरण्यासाठी टप्पे पाडून दिल्यास शेतकरी बिल भरण्यात सहकार्य करतील. शेतक-यांचा वीज पुरवठा पूर्ववत चालू होईपर्यंत माझे धरणे आंदोलन चालूच राहील, असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी जाहीर केले आहे.

यावेळी बोलताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आपासाहेब जगदाळे यांनी वीज प्रश्न सोडवण्यास तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे हे पूर्णपणे अपयशी ठरल्याचा हल्लाबोल केला. त्यांना शेतक-यांचे काहीही देणेघेणे नाही अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी अँड. कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, शरद जामदार, शकील सय्यद, देवराव जाधव, गजानन वाकसे, महादेव गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून महाविकास आघाडी सरकार व इंदापूरच्या लोकप्रतिनिधीवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी महावितरणकडून शेतक-यांचा वीज पुरवठा सुरु करेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरु राहील, असे जाहीर केल्याने इंदापूर तालुक्यातील वातावरण पेटले आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या