23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसोलापूरसराईत गुन्हेगार बॉबी शिंदे दुसर्‍यांदा स्थानबध्द

सराईत गुन्हेगार बॉबी शिंदे दुसर्‍यांदा स्थानबध्द

एकमत ऑनलाईन

सोलापूर : अनेक वर्षांपासून दहशत मागणाऱ्या बॉबी शिंदे याला तडीपारीचा आदेश बजावूनही तो धुडकावून लावत सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. अनेक गंभीर गुन्हे केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी त्याच्याविरुद्ध बुधवारी दुपारी एमपीडीए कायद्यान्वये दुसऱ्यांदा स्थानबद्धतेची कारवाई केली. त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

संबंधित आरोपीने शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक वर्षांपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी व्यापारी, सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून घातक शस्त्राद्वारे हल्ला करणे, खंडणी मागणे, चोऱ्या, अपहरण, बेकायदेशीर जमाव जमवून गैरकृत्य करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हेत्याच्याविरुद्ध दाखल आहेत.

शहरातील मरीआई चौक, आवसे वस्ती, आमराई, थोबडे वस्ती, देगाव रोड, पार्क चौक परिसरात त्याची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. फौजदारी चावडी, सलगर वस्तीमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. या

कृत्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी सन २०१७ मध्ये कलम ०३ एमपीडीए, १९८१ अन्वये सन २०२० मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १९५१ अन्वये कारवाई करण्यात आली होती. यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. पुन्हा त्याने सन २०२२ मध्ये अलीकडच्या काळात तडीपार आदेशाचा भंग करून सरकारी नोकरावर हल्ला करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या नियोजनाखाली सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरग, उदयसिंह पाटील, फौजदार विशेंद्रसिंग बायस, विनायक संगमवार, संदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले व सहकार्याने केली.

शहरात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे सराईत गुंड, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. े आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीडीए कायद्यान्वये अशीच कारवाई सुरू राहणार े पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

सचिन ऊर्फ बॉबी शिंदे याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही म्हणून त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश बजावले. त्यानुसार त्याला येरवडा कारागृहात दाखल करण्यासाठी पुण्याकडे रवानगी केली. पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून स्थानबद्धतेची दुसरी व या वर्षातील सहावी कारवाई आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या