26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeसोलापूरसाखरपोत्यांच्या बोलीकडे लागले विठ्ठलच्या सभासदांचे लक्ष

साखरपोत्यांच्या बोलीकडे लागले विठ्ठलच्या सभासदांचे लक्ष

एकमत ऑनलाईन

अपराजित सर्वगोड / प्रतिनिधी
शेतक-यांचा राजवाडा असणा-या जाणा-या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत एफआरपी बाबत आता मार्ग मोकळा झाला आहे. कारण १ लाख ९ हजार ९९३किं्वटल साखरेचा लीलाव तहसील कार्यालय पंढरपूर येथे गुरुवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

लिलावाद्वारे विकण्यात आलेल्या पैश्यातूनच शेतक-यांची थकीत एफआरपी दिली जाणार आहे मात्र यावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. एकूण थकीत देणे असलेल्या रकमे पेक्षाही काही कमी रक्कम या साखर पोती लिलावातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतक-यांना तोडणी वाहतूक सहीत एफ आर पी मिळते का?का काही टक्केवारी वरच समाधान मानून घ्यावे लागते हे मात्र गुरुवारी स्पष्ट होणार आहे. गाळप हंगाम २०२०-२१ मधील एफ आर पी थकीत येणे असल्याबाबत विठ्ठल कारखान्याची सन २॰१७-१८ मधील ४९ हजार ८३८ तर २०१८-१९ मधील ६० हजार १३५ अशी एकूण १ लाख ९ हजार ९७३किं्वटल साखर महसूल प्रशासनाने जप्त केली.

या साखरेचा लिलाव आता होत आहे. देय असलेल्या थकबाकी मात्र एकूण ३९ कोटी ७६ लाख ३३ हजार रुपये आहे.
लिलावासाठी जवळपास ५ लाख रुपयांचा धनादेश दिलेल्या वेळेत जमा करणे आवश्यक असणार आहे.याबाबत काही स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातही महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. लिलावात जी साखर उपलब्ध आहे ती साखर २०१७-१८ व२०१८-१९ या वर्षातील आहे. त्यामुळे साहजिकच साखर जुनी झाली असेल, काही साखर कुजली,फिजलीही असेल त्यामुळे या साखरेला अपेक्षेप्रमाणे ३१०० रुपये प्लस पाच टक्के जीएसटी प्रमाणे दर मिळणार का हा सवाल उपस्थित होत आहे?
कारण सदरची साखर ही किमान प्रतिकिं्वटल ३१०० व अधिक ५ टक्के जीएसटी प्रमाणे विक्री करावयाची असल्याने त्यापेक्षा कमी दराने निविदा सादर करू नये असे फर्मानही महसूल प्रशासनाने काढले आहे. साखर जुनी असल्यामुळे साखरेला २८०० ते २९०० रुपये दर मिळेल अशी चर्चा असून काही जणांनी हा दर ही पक्का करून घेतला असून केवळ कागदे रंगविण्यापुरताच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे अशी ही एक कुजबूज मात्र तालुक्यात रंगली आहे.

मायबाप ठाकरे सरकार व सरकारमधील काही मंडळी कारखाना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असून हीच काही नेते मंडळी लिलावामध्ये ढवळाढवळ करीत आहे. लिलावात साखरेला नेमकी किती बोली मिळते? शेतक-यांच्या पदरात पूर्ण एफआरपी पडणार का? का एफआरपी चे तुकडे पाडले जातील हे कारभारी मंडळींनी स्पष्ट करण्याचे धाडस दाखवले तरच त्यांना विठ्ठल कारखाना च्या निवडणुकीमध्ये मते मागताना अडचण येणार नाही अन्यथा त्यांनी भोळ्याभाबड्या सभासदा समोर मतांची जोडी पसरली तर मात्र त्या जोळीत नक्की काय पडेल हे सर्वांनाच ज्ञात झाले आहे. कारण विठ्ठल चा सभासद आता हुशार झाला असून या सभासदांना कोरोनाच्या काळात मोठे ऑक्सीजन मिळाले आहे. त्यामुळे सर्व सभासदांसह तालुक्याचे लक्ष गुरुवारच्या त्या साखरपोत्यांच्या बोली कडे लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या