23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्याचा ९७.५३ टक्के निकाल

सोलापूर जिल्ह्याचा ९७.५३ टक्के निकाल

एकमत ऑनलाईन

सोलापूर  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या पुणे विभागाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्हा ९७.५३ टक्के निकाल लागला आहे. यंदाही मुलींनी दहावी परीक्षेत बाजी मारली आहे. ९८.५२ टक्के इतक्या परीक्षार्थी मुली पास झाल्या आहेत. तर मुलांचा ९६.७३ इतका निकाल लागला आहे. मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्ह्यातून एकूण ३४ हजार ९९७ मुले आणि २८ हजार ५९७ मुली परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. यापैकी ३३ हजार ६६३ मुले व २७ हजार ९७० मुली उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात मोहोळ तालुका टॉपवर आहे.

१० वी परिक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९७.५३ टक्के इतका लागला आहे. ६३ हजार १९३ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यापैकी ६१ हजार ६३३ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यात २५ हजार ७४७ विशेष गुणवत्तेत तर २२ हजार ७१५ प्रथम श्रेणीत, ११ हजार ९२ द्वितीय श्रेणीय, तर २ हजार ७९ पास श्रेणीत आहेत.

सोलापूरातील रिपीटर विद्यार्थ्यांचा निकालही ८१.५८ टक्के इतका लागला आहे. ५ हजार ८४७ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यापैकी ४ हजार ७७० विद्यार्थी पास झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात नियमित परिक्षार्थीत सर्वच तालु्नयांचा निकाल ९६ ते ९८ टक्के दरम्यान आहे. जिल्ह्याात मुलींच्या पासाचा प्रमाण मुलांपेक्षा २ टक्क््यांनी म्हणजे ९८.५२ टक्के इतके आहे.
विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सीईओ प्रकाश वायचळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी अभिनंदन केले आहे.

माळशिरसचा निकाल ९७.२३ टक्के
माळशिरस तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.२३ टक्के एवढा लागला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी निकालात तब्बल अठरा टक्यांची वाढ झाली आहे. तालुक्यातून ६८०६ विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते पैकी ६६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

आईनेही मारली होती प्रथम क्रमांकाची बाजी
मोहोळ तालुक्यातील राजन पाटील विद्यालयामध्ये निवेदिता नाईकनवरे या विद्यार्थिनीने शाळेत दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यापूर्वी याच शाळेत निवेदिता हिची आई कल्याणी ह्या सन २००१-२००२ या सालात प्रथम क्रमांक मिळविल्याचे निवेदिता हिने सांगितले. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील राजन पाटील विद्यालयांमध्ये दहावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. या विद्यालयाचा निकाल 97.16% लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी निवेदिता नाईकनवरे यांना 91.2 टक्के% गुण मिळवून विद्यालय मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.

तालुकानिहाय निकाल
अक्कलकोट ९६.४३, बार्शी ९८.२८, करमाळा ९६.३१, माढा ९७.२६, माळशिरस ९७.२४, मंगळवेढा ९७.६१, मोहोळ ९८.५६, पंढरपूर ९७.५७, सोलापूर उत्तर दक्षिण ९७.६३, सांगोला ९७.७८

Read More  पंढरपुरात ७०० नागरिकांचे रक्तदान

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या