26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूरसोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; पती-पत्नी जागीच ठार

सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; पती-पत्नी जागीच ठार

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/मोहोळ
मोटारसायकलला पाठीमागून ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोळेगाव शिवारातील रेल्वे पुलाजवळ मंगळवारी (ता. 23) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला. अर्जुन नामदेव थिटे (वय 65) व अनिता अर्जुन थिटे (वय 60, दोघेही रा. एसआरपी कॅम्प, सोलापूर) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या पती – पत्नीची नावे आहेत.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अर्जुन थिटे व त्यांची पत्नी अनिता थिटे हे मूळ रा कोंबडवाडी (ता. मोहोळ) येथील रहिवासी आहेत. मृत अर्जुन थिटे हे एसआरपी मधील सेवानिवृत्त सहायक फौजदार होते तसेच राष्ट्रपती पदक विजेतेही होते. कोंबडवाडीहून घरगुती कार्यक्रम उरकून मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोघे पती – पत्नी सोलापुरातील राहत्या घरी मोटारसायकल (क्र. एमएच 13 – एके 7332) वरून निघाले होते. ते वडवळ पुलावरून जात असताना कोळेगाव शिवारात आले असता पाठीमागून सोलापूरकडे जाणा-या मालट्रकने (क्र. एपी 39 – व्ही 6829) मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन पती-पत्नी जागेवरच मृत झाले. मृत पती – पत्नी हे मोहोळ तालुक्­यातील रहिवासी असल्याने ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून, तपास सहाय्यक फौजदार विजयकुमार माने हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या