16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसोलापूरहैद्रा रस्त्याची वाईट अवस्था, भाविकांतून संताप

हैद्रा रस्त्याची वाईट अवस्था, भाविकांतून संताप

एकमत ऑनलाईन

विश्वनाथ चव्हाण / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागातील सुप्रसिद्ध हैद्रा येथील सैपन मुलक दर्गा हा महाराष्ट्र, कर्नाटकातील ंिहन्दु- मुस्लीम भांिवकाचे जागृत श्रध्दास्थान म्हणुन ओळखले जाते. या ठिकाणी विविध धार्मिक विधी व नवस फेडण्यासाठी लाखो भक्ताची गर्दी होत असते. अशा या हैद्रा रस्त्याची अवस्था इतकी भयानक असुन जागो जागी मोठमोठे खड्डे पडल्याने भाविकांना याचा खुप त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याबाबत ट्रस्ट्री कडुन सातत्याने रस्ता दुरूस्तीची मागणी करून देखील याकडे लोकप्रतिनिधीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दर्लक्ष व हलगर्जीपणा दिसुन येत आहे.भाविकांतुन प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

नागणसुर ते तीर्थक्षेत्र हैद्रा हा रस्ता १० किमीचा असुन रस्ता संपुर्णपणे उखडला गेला आहे. या तीर्थक्षेत्र येथे महाराष्ट्र कर्नाटकातुन भाविक लाखोच्या संख्येने येत असतात. अमावस्या व पोर्णिमेला विविध जाती धर्माचे भाविक नवस फेडण्यासाठी दर्शनाला येत असतात. याठिकाणी कार्यरत असलेले विश्वस्त मंडळ भाविकांच्या सुविधेसाठी सातत्याने धडपडत असतात. भाविकांच्या अडीअडचणी त्यांना होणारा त्रास,होणारा गैरसोय दुर करण्यासाठी त्यांचे नियोजन सदैव तत्पर असते.अशा या पवित्र जागृत तीर्थक्षेत्री भाविक तृप्त होऊन मार्गक्रमण करीत असतो.मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेची दखल घेण्यास कोणीही तयार नाही.लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कधीच गांभिर्याने बघीतले नाही. असा संतप्त सवाल भाविकांतून विचारला जातोय.परगावहून येणारा भाविक तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे दत्त अवतारी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन अक्कलकोट स्टेशन जवळील गौडगांव येथील जागृत मारुतीच्या मंदीरात दर्शन घेऊन हैद्रा येथे सैपन मुलक दर्ग्यात नतमस्तक होण्यासाठी जात असतो.

अनेक वर्षांपासून पिढी, रितीरिवाज यानुसार हैद्रा येथे नित्यनियमाने नाविन्याने दर्शनासाठी जाणा-या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.या ठिकाणी नवस फेडण्यासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ चालू असते.मात्र विशेषता एप्रिल, मे, जूनमध्ये नवस फेडणा-यांची संख्या लाखोंच्या घरात असते.हे सर्व भाविक नवस फेडण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करतात.कार,टमटम, टेम्पो, ट्रक यांमधून नवस फेडण्यास लागणारे साहित्य घेऊन येत असतात. अशा वेळी या भाविकांना दर्ग्याचे दर्शन घेण्या ऐवजी रस्त्यातील खड्ड्यांचे दर्शन घडत आहे. यासारखे दुर्देव ते काय असणार.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या