27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeसोलापूर४१४ मंडळांनी केली शक्तिदेवीची प्रतिष्ठापणा

४१४ मंडळांनी केली शक्तिदेवीची प्रतिष्ठापणा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरातील ४१४ सार्वजनिक मंडळांनी सोमवारी शक्तिदेवीची जल्लोषात प्रतिष्ठापना केली. यासाठी सुमारे २१०० पोलिसांचा कडक बंदोवस्त लावण्यात आला होता. पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली तोन पोलीस उपायुक्त, पाच सहायक पोलीस आयुक्त, २४ पोलीस निरीक्षक, ५० फौजदार व सहायक पोलीस निरीक्षक, ११६१ पोलीस अंमलदार, ७०० पुरुष होमगार्ड व १०० महिला होमगार्ड तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडी असा सुमारे २१०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच शहरातील प्रमुख शक्तिदेवी मंदिराजवळ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरात सकाळपासूनच शक्तिदेवी प्रतिष्ठापनेनिमित्त सार्वजनिक मंडळांनी मिरवणुका काढल्या. वाहतुकीचा मिरवणुकीसाठी व्यत्यय होऊ नये, यासाठी सोमवारी सकाळी शहरात साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या