27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूर७५० वर्षांची परंपरा असलेली विमलेश्वर महादेवाच्या कावड यात्रेला आजपासुन प्रारंभ

७५० वर्षांची परंपरा असलेली विमलेश्वर महादेवाच्या कावड यात्रेला आजपासुन प्रारंभ

एकमत ऑनलाईन

सचिन जगताप /बेंबळे
माढा तालुक्यातील बेंबळे येथील विमलेश्वर (शंभू महादेव )हे ग्रामदैवत आहे .या विमलेश्वर ग्रामदैवत आसलेल्या शंभू महादेवाची कावड यात्रा शिखर शिंगणापुरला नेण्यासाठी आज पासुन प्रारंभ झाला.शंभू महादेवाच्या कावड यात्रेला ७५० वर्षोची परंपरा आहे.

बेंबळे हे सात महादेवांचे (सप्तलींगे ) ची पांढर म्ाांनली जाते .कावडीला असणा-या दोन हांड्यावर (गडु)आहेत त्यावेळी बेंबळेचे नाव विमलेश्वर होते पुढे ते बेंबळेश्वर व नंतर बेंबळे झाले संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली तेव्हापासून ही यात्रा भरते आसा ईतीहास आहे .ताम्रलेंखाचे पुरावे असल्याचे गडु (हांडे) मिश्रधातुचे बनविले असुन यावर आप्पजी बिन ,विठूजी पाटील ,दौलत बिन,गोवींद जोशी ,कुमाभाई,बाबाजी सोनार,बापु मुलाणी,गेनु सुतार,नारायण पाटील ,महामंद ताबोंळी,रामजी सुतार,सदाशिव मोटे या भाविकांनी १२७० साली शंभू महदेवाच्या कावडीसाठी मित्ती श्रावण पंचमी इ.स.१२७० ला घेतले असा उल्लेख आहे .ही अक्षरे दोन्ही गडुवर कोरली आहेत .चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला माहदेवाची कावड उभारली जाते व रांम नवमीला बेंबळे येतुन शिखर शिंगणापुरला प्रस्थान करते.कावडी बरोबर 400ते 500 शिवभक्त प्रस्थान करतात .

संध्याकाळी नातेपुतेच्या महादेव मंदीरात पहीला मुक्काम करून अवघड डोंगर घाट चढत दुस-या दिवशी दुपारपरर्यंत शिखर शिंगणापुरला पोहचते. चैत्र शुद्ध कामदा एकादशीला महादेवाला पाहटे धार घातली जाते .यावेळी बेंबळे गावातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती उपस्थितीत असते व त्याच दिवशी बेंबळेकडे निघते .जायला दोन दिवस घेणारी कावड येताना मात्र एका दिवसात १००ते १२५ किलोमीटरचे आंतर कापून संध्याकाळी ६ ते ७ सुमारास बेंबळे भीमा नदीकाठी पोहचते.दुस-या दिवशी भीमानदी काटापासुन विमलेश्वर मंदीरात कावड नेण्यासाठी सज्ज होते .कावड मंदीराकडे नेत आसताना वाटेत प्रत्येक कूटुंबातील स्त्रीया पुजा करण्साठी उभा असतात व मोठ्या भक्ती भावाने पुजा करतात .मोठ्या जल्लोषात कावड विमलेश्वर मंदिरकडे नेण्यात येते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या