प्रतिनिधी/उपळेदुमाला
प्रा.इंद्रजीत पाटील लिखित जीवनाचा उपासक-कर्मवीर लोहोकरे गुरूजी चरित्रग्रंथाला हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत जयंती व पुण्यतिथी निमित्त स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार-२०२१ हा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचे वितरण ३०/११/२०२१ वार-मंगळवार रोजी आसू,ता.फलटण,जि.सातारा या ठिकाणी झाले.
याप्रसंगी जीवन इंगळे,गांधीधाम आश्रम, राजापूर,खटाव,ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज ंिहगणकर,चिखली,पुणे,सुप्रसिद्ध कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे, प्रमोद झांबरे, चेअरमन सा.जि.मजूर फेडरेशन,सातारा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याच मान्यवरांच्या हस्ते लेखक इंद्रजीत पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार घेते वेळी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,गौडगाव,ता.बार्शीचे सचिव पंडितराव लोहोकरे हे स्वत: उपस्थित होते.
पुरस्कार वितरणानंतर कवी हनुमंत चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पुरस्काराचे संयोजन काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान तसेच स्वदेशी बचतगट सकुंडेमळा,आसू,ता.फलटण,जि.सातारा यांनी केले होते. या चरित्रग्रंथाला हा पहिलाच पुरस्कार असून प्रा.इंद्रजीत पाटील यांची याआधी चातक (कवितासंग्रह), चाकरी(कवितासंग्रह)ही पुस्तके प्रकाशित झाली असून शेलक्या बारा (कथासंग्रह), चिबाड (कवितासंग्रह), सुवासिनीचं कुंकू (तीन अंकी नाटक) चारोळीची आरोळी (चारोळी संग्रह) इत्यादी पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. संस्थेचे अध्यक्ष विनायकराव गरड व इतर संचालक मंडळाने लेखक इंद्रजीत पाटील यांचे अभिनंदन केले.व सर्वत्र त्यांचे विशेष कौतुक होत आहे.