24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeसोलापूरराज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारूविरोधात धडक मोहीम

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारूविरोधात धडक मोहीम

एकमत ऑनलाईन

सोलापूर : एम्लॉयमेंट चौक ते सात रस्ता दरम्यान हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तो गाडी टाकून पळून केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५ जुलै रोजी जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेत एकूण १२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर एकूण एक लाख ७१ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दुय्यम निरीक्षक देशमुख यांना सात रस्ता ते एम्प्लॉयमेंट चौक रोडने एका दुचाकीवरून हातभट्टीच्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी संशयिताला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तो दुचाकी जागेवरच सोडून पळून गेला. १४० लिटर हातभट्टीच्या दारूसह एकूण ७७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

दुय्यम निरीक्षक मनीषा मिसाळ यांनी गोंधळे वस्ती ते गांधीनगर रोड, अक्कलकोट रोडवर हातभट्टीची दारू पकडली. आशा नगर एमआयडीसी रोड येथील घरामध्ये छापा टाकून फ्रुट बिअरच्या ५४० बाटल्या जप्त केल्या. वेळापूर (ता. माळशिरस) येथे सांगोलाचे दुय्यम निरीक्षक छत्रे यांनी धाब्यावर धाड टाकली. याठिकाणी जितेंद्र मधुकर गंभिरे (रा. अकलूज) याच्याकडून देशी दारूच्या २५ बाटल्या जप्त केल्या. वेळापूर बसस्थानकाच्या पाठीमागे आरिफ वजीर पठाण याच्याकडून देशी दारूच्या ३५ बाटल्या व ३५ लिटर हातभट्टीची दारू जप्त केली.

निरीक्षक पंढरपूर व दुय्यम निरीक्षक, पंढरपूर यांच्या पथकाने तीन गुन्हे नोंदविले असून, पंढरपूर शहरामधील हनुमान नगर येथे शंकर महादेव हेगडे याच्याकडून ताड़ी, संत पेठेतून सुभाष सोपान वाघमारे याच्याकडून २५ लिटर हातभट्टीची दारू जप्त केली आहे. वाखरी गावाच्या हद्दीत अमोल प्रल्हाद गुजर याच्या राहत्या घरातून १५ लिटर हातभट्टीची दारू जप्त केली.

दुय्यम निरीक्षक, करमाळा यांच्या पथकाने येलमवाडी रोडवर पाचफुलेवाडी (ता. माढा) येथे माधव पंढरी पाचफुले याच्या घरातून देशी दारूच्या ३० बाटल्या व विदेशी दारुच्या १६ बाटल्या जप्त केल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आषाढी वारीनिमित्त अवैध दारुविक्री, वाहतूक व निर्मिती तसेच हातभट्टीच्या दारूविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. परिसरात अवैध दारुविक्री, निर्मिती, वाहतूक होत असल्यास त्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी असे आवाहन
नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या