सोलापूर : बनावट कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याचे भासवून शासनाकडील मंजूर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी आ. कल्याणशेट्टी, आमदार पुत्र रोहन व मनीष देशमुख यांच्यासह दहा जणांना न्यायदंडाधिकारी भंडारी यांनी जामीन दिला.
लोकमंगल मल्टिस्टेट को. ऑप. बीबीदारफळ या सोसायटीचे संचालक आ. सचिन कल्याणशेट्टी, रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागांवकर, प्रकाश वैजिनाथ लातुरे, बशीर बादशहा शेख, मुरारी शिंदे, हरिभाऊ चौगुले, भीमाशंकर नरसगोंडे, मनीष सुभाष देशमुख (रा. सर्व रा. सोलापूर) असे जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार आप्पाराव गोपाळराव कोरे (रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर) यांनी लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी या संस्थेने प्रस्ताव सादर करताना दिलेली कागदपत्रे खोटी व बनावट आहेत अशा आशयाची तक्रार फिर्यादीनी केली होती.
आरोपींच्या वतीने अॅड. संतोष न्हावकर यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्रा धरला. आरोपींतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. अर्चना कुलकर्णी, अॅड. वैष्णवी न्हावकर, अॅड. राहुल पोटफोडे, सरकारतर्फे अॅड. जोशी तर मूळ फिर्यादीतर्फे अॅड. पवार यांनी काम पाहिले.