पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला भाविकांनी दान स्वरूपात दिलेल्या जमिनी १५६ गावांमध्ये विखुरलेल्या आहेत. यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे तसेच अमरावती, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, अकोला, नगर या जिल्ह्यांमध्ये आहे. याची एकूण क्षेत्रफळ ९४२.०४ आर म्हणजे २३५५ एकर आहे. त्यापैकी ४०८.७२ हेक्टर आर. म्हणजेच १०२१ एकर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. त्यावर मंदिर समितीचे नाव दाखल केले आहे. आणखी १ हजार ३२४ एकर जमिनीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात दरवर्षी भरणा-या चार यात्रा आणि महिन्याची व 15 दिवसाची एकादशी साठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात विठ्ठलावर नितांत श्रद्धा असलेल्या भाविकांनी विठ्ठल जमिनी दान स्वरूपात दिलेल्या आहेत या स्वरूपात दिलेल्या जमिनी मंदिर समितीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे आत्तापर्यंत २३५५ एकर पैकी १०२१ जमीन ताब्यात घेतले आहेत तर उर्वरित १३३४ एकर जमिनीचा शोध घेतला जात आहे. तर १०२१ एकर पैकी १०२.१६ आर शेत्र शेतक-यांना लिलाव पद्धतीने भाडेपट्ट्याने दिले आहे. यातून वर्षाकाठी मंदिर समितीला ११ लाख ५६ हजार रुपये उत्पन्न मिळते.
कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये ११३ एकर जमिनीवर नाव दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जमिनीवर नाव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंदिर समितीने ताब्यात घेतलेल्या जमिनंबाबत ६४ प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत त्यामध्ये ८ निकाल मंदिर समितीच्या बाजूने लागले आहेत.तर वरील ५६ न्यायालयाने प्रकरणासाठी स्वतंत्र विधिज्ञची नेमणूक करण्यात आली आहे. जमिनीच्या खंडातून मिळत असलेले उत्पन्न मंदिर समितीच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनला आहे. या जमीन ताब्यात घेण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच सर्व रेकॉर्डचे स्कॅंिनग केले जात आहे.
संरक्षणाच्या तरतुदीत सलग सातव्यावर्षी वाढ