22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसोलापूरसोलापूर शहरात ११९ नव्या बाधितांची नोंद, तिघांचा मृत्यू

सोलापूर शहरात ११९ नव्या बाधितांची नोंद, तिघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहर परिसरात कोरोणा विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे आज एकाच दिवशी 119 जणांची नोंद घेण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 156 जण बरे झाले परंतु मृत्यूचे थैमान थांबत नसून 3 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात शुक्रवारी दि.14 मे रोजी कोरोणाचे नवे 119 रुग्ण आढळले असून यामध्ये 62 पुरुष तर 57 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकूण 1959 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1840 निगेटिव्ह तर 119 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 156 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली. कोरोणाळे आज 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

के.पी. शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या