37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeसोलापूरसोलापूरच्या ग्रामीण भागात १२५ नवे कोरोनाबाधित, ८ जणांचा मृत्यू

सोलापूरच्या ग्रामीण भागात १२५ नवे कोरोनाबाधित, ८ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 125 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज 248 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे. कोरोनामुळे आज पुन्हा एकदा आठ जणांचा बळी गेला आहे.

आज एक हजार 402 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 277 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 28 हजार 702 एवढी झाली आहे. याशिवाय 803 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित झाल्यामुळे अद्यापही तीन हजार 970 जण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत तर 20 हजार 929 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे. आज तरंगफळ (ता. माळशिरस) येथील 66 वर्षाचे पुरुष, गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील 75 वर्षांची महिला, सिद्धार्थनगर माळशिरस येथील 71 वर्षाची महिला, स्टेशन रोड पंढरपूर येथील 65 वर्षाची महिला, जवळा (ता. सांगोला) येथील 72 वर्षाचे पुरुष, शितल शहा हॉस्पिटल जवळ पंढरपूर येथील 46 वर्षाचे पुरुष, डोरले गल्ली मंगळवेढा येथील 68 वर्षाचे पुरुष, होनमुर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 45 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरात ३४ नवे बाधित
शहरातील सर्वाधिक पुरुषच कोरोनाचे बळी ठरले असून एकूण रुग्णांमध्येही पुरुषच अव्वल आहेत. आतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात 340 पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरातील तीन हजार 787 महिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 172 महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. आज शहरात 346 अहवालात 19 पुरुष आणि 15 महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आयुक्­त पी. शिवशंकर यांनी सर्व नागरिकांना सोशल डिस्टंिन्सग, मास्क, सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

शहरात आज रेसिडेन्सी क्­वार्टर, शाहीर वस्ती (भवानी पेठ), बाळे, नेताजी सुभाष सोसायटी (भारती विद्यापीठजवळ), जीवनज्योती नगर (रंगभवन), गांधी नगर (अक्­कलकोट रोड), संतोष नगर (बाळे), स्वामी समर्थ नगर, न्यू पाच्छा पेठ (अशोक चौक), बिलाल नगर (जुळे सोलापूर), लष्कर (दक्षिण सदर बझार), विडी घरकूल, बाल शिवयोगी नगर, लक्ष्मी- विष्णू हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), भवानी पेठ, कर्णिक नगर, हैदराबाद रोड, सात रस्ता (रेल्वे लाईन), भवानी पेठ, अंत्रोळीकर नगर (होटगी रोड), आशा नगर (एमआयडीसी रोड) आणि विजय देशमुख नगर (विजयपूर रोड) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात सध्या अवघे 43 संशयित होम क्­वारंटाईन असून 87 जण इन्स्टिट्यूशनल क्­वारंटाईन आहेत.

भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांसमोरच एकाची हत्या

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या