27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeसोलापूरडिलरशिपचे गाजर दाखवून १३ लाखांचा गंडा

डिलरशिपचे गाजर दाखवून १३ लाखांचा गंडा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : ई बाइकची डिलरशिपसाठी कंपनीच्या सूचनेनुसार वेळोवेळी बँकेतून आरटीजीएसद्वारे १३ लाख ७७ हजार ४७९ रुपये भरूनही डिलरशिप मिळाली नाही. कंपनीकडून सोलापूरच्या व्यापायाला गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक झाल्याने शकील अहमद मुईनोद्दीन पटेल या व्यार्पा­याने पोलिसांकडे धाव घेतली आहे.

फिर्यादी शकील पटेल (रा. अचिव्हर्स हॉलशेजारी खड्डा तालीम न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांचा गारमेंट कपड्याचाव्यापार होता. तो बंद करून त्यांनी ई- बाइक कंपनीची डिलरशिप घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते लातूर येथे जाऊन ओकिनावा इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला भेट दिली. तेव्हा तेथे कळले की ओकिनावच्या वेबसाइटवर जाऊन डिलरशिपचा फॉर्म भरावा लागेल, मग कंपनी संपर्क करेल असे कंपनीचे गौतम कृष्णा व दीपक अग्रवाल यांनी सांगितले. डिलरशिपसाठी एन. ओ. सी. व्हेरीफिकेशन बुकिंगसाठी पैसे लागतील असे सांगून वेळोवेळी फोन करून एकूण १३ लाख ७७ हजार ५७९ रुपये बँकेतून आरटीजीएसद्वारे पाठवले. यानंतर कंपनीकडून प्रतिसाद मिळेनासा झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पटेल यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक बादोले करीत आहेत.

गारमेंट व्यवसाय बंद करून नवा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने ई-बाइकची डिलरशिप करण्याचा प्रयत्न होता. मात्र पैसेही गेले आणि डिलरशिपही मिळाली नाही. मोठ्या रकमेचा आर्थिक फटका बसल्याचे तक्रारदार शकील पटेल यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या